१९४९: जनरल करिअप्पा यांनी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.
🕉|| सुप्रभात ||युगाब्द :५१२२भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक पौष २५ शके १९४२सूर्योदय : ०७:१० सूर्यास्त : १८:१८चंद्रोदय : ०८:५६ चंद्रास्त : २०:२९शक सम्वत : १९४२ शार्वरीचंद्र माह : पौषपक्ष : शुक्ल पक्षतिथि : द्वितीया - ०८:०४ पर्यंतनक्षत्र : धनिष्ठा - ०५:१७, जानेवारी १६ पर्यंतयोग : सिद्धि - २०:२३ पर्यंतकरण : कौलव - ०८:०४ पर्यंतद्वितीय करण : तैतिल - १९:५० पर्यंतसूर्य राशि : मकरचंद्र राशि : मकर - १७:०६ पर्यंतराहुकाल : ११:२१ ते १२:४४गुलिक काल : ०८:३३ ते ०९:५७यमगण्ड : १५:३१ ते १६:५५अभिजितमुहूर्त : १२:२२ ते १३:०६दुर्मुहूर्त : ०९:२४ ते १०:०८दुर्मुहूर्त : १३:०६ ते १३:५१अमृत काल : १८:४८ ते २०:२४वर्ज्य : ०९:०७ ते १०:४४।। विश्वाव्यापक तूंचि होसी । ब्रम्हा विष्णू व्योमकेशी ।। धरिला वेष तू मानुषी । भक्तजन तारावया ।।श्री नृसिंह सरस्वतीचा अवतार काल शके १३०० ते १३८० (इ.स. १३७८ ते १४५८) असा आहे. श्रीगुरुचरित्र हा अपूर्व ग्रंथ दत्तसंप्रदायाचा वेदतुल्य, प्राणप्रिय ग्रंथ आहे. प्रापंचिकांचा आणि पारमार्थिकांचा तो मनोकामना पूर्ण करणारा चिंतामणीच आहे. या वेदतुल्य गुरुचरित्राचे चरित्रनायक आहेत श्री नृसिंह सरस्वती. श्री गुरूचरित्रात अध्याय ११ ते ५१ या अध्यायात त्यांचे समग्र लीलाचरित्र आलेले आहे. श्री नृसिंह सरस्वती संन्यासधर्माचे सर्वोत्तम आदर्श होते. श्रीनृसिंह सरस्वती दत्तोपासनेचे संजीवक होते. तेराव्या शतकाच्या अखेरीस दत्तोपासनेच्या पुराणप्रवाहात संजीवन ओतण्याचे कार्य श्रीनृसिंह सरस्वतींनी केले. समग्र महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात ते दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरले. आज श्री नृसिंह सरस्वती जयंती आहे• १९९८: भारताचे दुसरे पंतप्रधान गुलजारीलाल नंदा यांचे निधन. (जन्म: ४ जुलै ,१८९८)संघर्षमय — नामदेव ढसाळ यांचा जन्म १५ फेब्रुवारी इ.स. १९४९ रोजी पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यातील कनेरसरशेजारच्या पूर या खेड्यात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने लहानपणीच ते वडिलांसोबत मुंबईला आले. मुंबईतील गोलपीठा या वेश्यावस्ती असलेल्या भागातील झोपडपट्ट्यांमध्ये त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील खाटीक होते. नामदेव ढसाळांनी मुंबईमध्ये अनेक वर्षे टॅक्सी चालवली. ढसाळांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर मोठा प्रभाव होता. त्यांनी काव्य, गद्य, वृत्तपत्रांतील स्तंभलेखन यातून आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार मांडले. त्यांच्या क्रांतिकारी साहित्याची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली.इ.स. १९७३ मध्ये नामदेव ढसाळ यांचा पहिला कवितासंग्रह गोलपिठा प्रकाशित झाला. मूर्ख म्हातार्याने डोंगर हलवले हा माओवादी विचारांवर आधारित, तर प्रियदर्शिनी हा त्यांचा इंदिरा गांधी यांच्या विषयीचा कविता संग्रह आहे. तसेच खेळ हा शृंगारिक कवितांचा संग्रह आहे.ढसाळ यांनी साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा, वेदनांना प्रसिद्धी दिली. महाराष्ट्र आणि भारताला प्रभावित करणाऱ्या 'दलित पँथर' या आक्रमक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. या संस्थेची स्थापना त्यांनी इ.स. १९७२ मध्ये दलित चळवळीतील समवयस्क सहकार्यांच्या व साहित्यिकांसह केली. या संघटनेवर अमेरिकेतील ब्लॅक पँथर चळवळीचा प्रभाव होता. या संघटनेद्वारा ढसाळ यांनी दलितांच्या अनेक प्रश्नांवर उग्र आंदोलने केली व तत्कालीन सरकारांना दलित हिताच्या भूमिका घेण्यास भाग पाडले. कालांतराने या चळवळीत फूट पडल्यावरही ढसाळ हे दलित पँथरमध्येच राहिले मराठवाडा विद्धयापीठ नाम विस्तारमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. दलित चळवळीला त्याचे महत्वाचे योगदान आहे.नामदेव ढसाळ आयुष्याची शेवटची अनेक वर्षे मायस्थेनिया ग्रॅव्हीज या दुर्धर आजाराने ग्रस्त होते. याशिवाय त्यांना कॅन्सरचा आजारही जडला होता.आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र , प्रियदर्शनी (१९७६),खेळ (१९८३),गोलपीठा (१९७२),तुझे बोट धरून चाललो आहे मी,तुही इयत्ता कंची (१९८१),मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे, मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले (१९७५), या सत्तेत जीव रमत नाही (१९९५),मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे (निवडक कवितांचा संग्रह),गांडू बगीचा,निर्वाणा अगोदरची पीडा ह्या त्यांच्या कविता आहेत. निगेटिव्ह स्पेस, हाडकी हाडवळा,उजेडाची काळी दुनिया, ह्या कादंबऱ्यांचे लेखन केले.• २०१४: दलित साहित्यिक नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचे निधन. (जन्म: १५ फेब्रुवारी, १९४९)* घटना : १५५९: राणी एलिझाबेथ (पहिली) यांची इंग्लंडची राणी म्हणून वेस्टमिन्स्टर अॅबे येथे राज्याभिषेक झाला.१७६१: पानिपतचे तिसरे युद्ध संपले.१८६१: एलिशा जी. ओटिस या संशोधकाला सुरक्षित उद्वाहकाचे (Lift) जगातील पहिले पेटंट मिळाले.१८८९: द पेंबरटन मेडिसिन कंपनी या कंपनीची अटलांटा, जॉर्जिया, यू. एस. ए. येथे स्थापना झाली. ही कंपनी सध्या द कोका कोला कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे.१९४९: जनरल करिअप्पा यांनी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.१९७०: मुअम्मर गडाफी लीबीयाचे सर्वेसर्वा झाले.१९७३: जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर यांनी भारताचे ९ वे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. हे लष्करप्रमुख होणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत.१९९६: भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव बदलुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) असे करण्यात आले.१९९९: गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.२००१: सर्वांना मोफत असलेला ज्ञानकोश विकीपिडिया हा इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध झाला.• मृत्यू : • १९७१: अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार दीनानाथ दलाल यांचे निधन. (जन्म: ३० मे , १९१६)• १९९४: गुजराथी लेखक, कवी व ज्योतिषी हरिलाल उपाध्याय यांचे निधन. (जन्म: २२ जानेवारी, १९१६)• २००२: राष्ट्रपतिपदक विजेत्या तमाशा कलावंत विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर यांचे निधन. मायबाप प्रेक्षकांनी 'तमाशासम्राज्ञी’ हि पदवी बहाल केली.• २०१३: समाजसेवक डॉ. शरदचंद्र गोखले यांचे निधन. (जन्म: २९ सप्टेंबर १९२५)* जन्म : १९२०: कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. सी. हिरेमठ यांचा जन्म. (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९८)१९२१: महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर २००७)१९२६: भारतीय कुस्तीगीर (अर्जुन पुरस्कार मरणोत्तर ) खाशाबा जाधव यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑगस्ट १९८४)१९२९: गांधीवादी नेते आणि नोबेल पारितोषिक विजेते मार्टिन ल्युथर किंग यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९६८)१९३१: मराठीह कथाकार शरच्चंद्र वासुदेव चिरमुले यांचा जन्म.१९४७: पत्रकार नितीश नंदी यांचा जन्म.१९५६: बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांचा जन्म.