सवाई गंधर्वांचा आवाज मुळात गोड नव्हता गळाही बोजड होता पण त्यांनी अथक परिश्रम करून आपला आवाज कमावला आणि तो झारदार व सुरेल बनविला.
युगाब्द :५१२२भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक पौष २९ शके १९४२सूर्योदय : ०७:१०सूर्यास्त : १८:२१चंद्रोदय : ११:२९चंद्रास्त : २३:५४शक सम्वत : १९४२ शार्वरीचंद्र माह : पौषपक्ष : शुक्ल पक्षतिथि : षष्ठी - १०:५८ पर्यंतनक्षत्र : उत्तराभाद्रपदा - ०९:५५ पर्यंतयोग : शिव - १८:४९ पर्यंतकरण : तैतिल - १०:५८ पर्यंतद्वितीय करण : गर - ००:०३, जानेवारी २० पर्यंतसूर्य राशि : मकरचंद्र राशि : मीनराहुकाल : १५:३३ ते १६:५७गुलिक काल : १२:४५ ते १४:०९यमगण्ड : ०९:५८ ते ११:२२अभिजितमुहूर्त : १२:२३ ते १३:०८दुर्मुहूर्त : ०९:२४ ते १०:०९दुर्मुहूर्त : २३:२९ ते ००:२०, जानेवारी २०वर्ज्य : २३:१६ ते ०१:०२, जानेवारी २०सवाई गंधर्व- त्यांची गायनाची आवड लक्षात घेऊन त्यांच्या वडिलांनी त्यांना १८९७-९८ मध्ये बळवंतराव कोल्हटकरांकडे गाण्याची तालीम दिली. पुढे किराणा घराण्याचे प्रवर्तक. १९००-१९०७ कालावधीत अब्दुल करीमखाँ यांच्याकडे त्यांनी गायनाची कसून तालीम घेतली . त्याचप्रमाणे निसार हुसेनखाँ, हैदरबक्ष, मुरादखाँ यांच्याकडून त्यांनी चिजांचे शिक्षण घेतले. १९०८ मध्ये त्यांनी अमरावतीस ‘ नाटयकला प्रवर्तक मंडळी ’त गायक-नट म्हणून प्रवेश केला व ते स्त्रीभूमिका करू लागले. त्या काळात बालगंधर्व यांच्या स्त्रीभूमिका सवाई गंधर्वअत्यंत लोकप्रिय असतानाही, कुंदगोळकरांच्या रूपाने स्त्रीभूमिका करणारा एक नवा गायक-नट रंगभूमीवर अवतीर्ण झाला व अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. या लोकप्रियतेमुळेच वऱ्हाडाचे नबाब म्हणून प्रसिद्ध असलेले दादासाहेब खापर्डे यांनी अमरावती येथे १९०८ साली त्यांना ‘सवाई गंधर्व’ ही पदवी दिली व या टोपण नावानेच ते पुढे जास्त ओळखले जाऊ लागले. सवाई गंधर्व यांचा विशेष लौकिक झाला, तो हरिभाऊ आपटे यांच्या संत सखू नाटकातील सखूच्या भूमिकेमुळे. या लौकिकाच्या पाठबळावरच त्यांनी स्वत:ची ‘नूतन संगीत नाटक मंडळी ’ स्थापन केली व ती पुढे दहा वर्षे चालविली. त्यानंतर ‘ यशवंत संगीत मंडळी ’मध्ये व शेवटी हिराबाई बडोदेकरांच्या ‘ नूतन संगीत विदयलया ’च्या नाटयशाखेत अशी स्थित्यंतरे करीत १९३२ मध्ये त्यांनी नाटयजीवनाला कायमचा रामराम ठोकला.या चोवीस वर्षांच्या नाटयजीवनात त्यांनी केलेल्या सुभद्रा, तारा, संत सखू, कृष्ण इ. भूमिका विशेष गाजल्या, तसेच ‘ बघुनी उपवनी ’, ‘ असताना यतिसन्निध ’, ‘ व्यर्थ छळिले ’ इ. त्यांची नाटयपदे खूपच लोकप्रिय झाली. तुलसीदास नाटकातील त्यांनी गायिलेले ‘ राम रंगी रंगले मन ’ हे भजनही अतिशय गाजले. १९३० नंतर संगीत रंगभूमीची सद्दी संपल्यावर सवाई गंधर्व शास्त्रीय संगीताच्या मैफलींकडे वळले. त्यांचा रंगभूमीवरील समृद्ध अनुभव, कल्पनाशक्तीची उत्तुंग भरारी, जास्त व विविध स्वनरंग वापरण्याची क्षमता व गायनातील समृद्ध भावरंगपट आदी अलौकिक गुणांमुळे त्यांचा संगीताविष्कार समृद्ध व प्रभावी ठरत असे. त्यांची रागाची बढत जास्त पद्धतशीर, तसेच तानांमध्ये वैविध्य व लयकारीत आक्रमकता दिसून येई.सवाई गंधर्वांचा आवाज मुळात गोड नव्हता गळाही बोजड होता पण त्यांनी अथक परिश्रम करून आपला आवाज कमावला आणि तो झारदार व सुरेल बनविला. ते ख्याल, तराणा, ठुमरी, भजन, नाटयसंगीत असे विविध गानप्रकार उत्तम रीत्या सादर करीत असत. किराणा घराण्याच्या फिरतीत त्यांनी अधिक वैविध्य व गायकीत आक्रमकपणा आणून किराणा घराण्याची गानपरंपरा अधिक समृद्ध केली . त्यांच्या शास्त्रोक्त रागदारी गाण्यांच्या व नाटयपदांच्या अनेक ध्वनिमुद्रिका एच्. एम्. व्ही. कंपनीने काढल्या. १९४२ मध्ये त्यांना पक्षाघाताचा तीव्र झटका आला व परिणामत: पुढील दहा वर्षे त्यांचे गाणे पूर्णत: थांबले. पुणे येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या शिष्यशाखेत गंगुबाई हनगल, भीमसेन जोशी, फिरोज दस्तुर, छोटा गंधर्व, मास्तर कृष्णराव इ. मान्यवर गायक-गायिकांचा समावेश होतो.१८८६ : हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व यांचा जन्म. (मृत्यू : १२ सप्टेंबर १९५२)घटना :१८३९ : ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने एडनचा ताबा घेतला.१९०३ : अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रुझव्हेल्ट यांनी इंग्लंडचे राजे एडवर्ड (सातवे) यांना बिनतारी संदेश पाठवला. अटलांटिक महासागरापार पाठवलेला हा पहिला बिनतारी संदेश होता.१९४२ : दुसरे महायुद्ध – जपानी सैन्याने ब्रह्मदेशवर आक्रमण केले.१९४९ : पुणे नगरपालिका व उपनगरपालिका विसर्जित होऊन पुणे महानगरपालिका स्थापन झाली.१९५४ : कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाचे भूमिपूजन.१९५६ : देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकूम जाहीर.१९६६ : भारताच्या पंतप्रधानपदी इंदिरा गांधी यांनी पदभार स्वीकारला.१९६८ : पहिली यशस्वी ह्रदयरोपण शस्त्रक्रिया डॉ. ख्रिस्तोफर बर्नाड यांनी केली.१९८६ : (c)brain नावाचा कॉम्प्युटरचा पहिला व्हायरस पसरण्यास सुरूवात झाली.२००७ : सरदार सरोवर धरणाचा वीजनिर्मिती प्रकल्प देशाला अर्पण करण्यात आला.मृत्यू :१९०५ : भारतीय तत्त्वज्ञानी देबेन्द्रनाथ टागोर यांचे निधन. (जन्म : १५ मे १८१७)१९६० : मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक दादासाहेब तोरणे यांचे निधन. (जन्म : १३ एप्रिल , १८९०)१९९० : भारतीय तत्त्वज्ञानी चंद्र मोहन जैन ऊर्फ आचार्य रजनीश यांचे निधन. (जन्म : ११ डिसेंबर,१९३१)२००० : उद्योगपती व क्रिकेट प्रशासक मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम. ए. चिदंबरम यांचे निधन. (जन्म : १२ ऑक्टोबर १९१८)जन्म :१८९२ : विनोदी लेखक चिंतामण विनायक जोशी यांचा जन्म. (मृत्यू : २१ नोव्हेंबर १९६३)१८९८ : मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित विष्णू सखाराम तथा वि. स. खांडेकर यांचा जन्म. (मृत्यू : २ सप्टेंबर १९७६)१९०६ : चित्रपट दिगदर्शक, अभिनेते आणि निर्माते विनायक दामोदर कर्नाटकी उर्फ मास्टर विनायक यांचा जन्म. (मृत्यू : १९ ऑगस्ट १९४७)