IMG-LOGO
मनसा स्मरामि

बुधवार, २० जानेवारी २०२१

Wednesday, Jan 20
IMG

२००९ : अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी झाला.

युगाब्द :५१२२भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक पौष ३० शके १९४२सूर्योदय : ०७:१०सूर्यास्त : १८:२१चंद्रोदय : १२:०३चंद्रास्त : ००:४१, जानेवारी २१शक सम्वत : १९४२ शार्वरीचंद्र माह : पौषपक्ष : शुक्ल पक्षतिथि : सप्तमी - १३:१४ पर्यंतनक्षत्र : रेवती - १२:३७ पर्यंतयोग : सिद्ध - १९:३१ पर्यंतकरण : वणिज - १३:१४ पर्यंतद्वितीय करण : विष्टि - ०२:३०, जानेवारी २१ पर्यंतसूर्य राशि : मकरचंद्र राशि : मीन - १२:३७ पर्यंतराहुकाल : १२:४६ ते १४:१०गुलिक काल : ११:२२ ते १२:४६यमगण्ड : ०८:३४ ते ०९:५८अभिजितमुहूर्त : कोई नहींदुर्मुहूर्त : १२:२३ ते १३:०८अमृत काल : ०९:५६ ते ११:४३नट व गायक कृष्णराव- आपल्या गुरूंच्या आग्रहास्तव मास्तर कृष्णरावांनी गंधर्व नाटक मंडळींत प्रवेश केला. ते बालगंधर्वांबरोबर मुख्य भूमिका करत असत. ह्या दरम्यान त्यांनी 'संगीत शारदा', 'संगीत सौभद्र', 'एकच प्याला' यांसारख्या अनेक संगीत नाटकांत काही पुरुष (गायक नट) भूमिका आणि बऱ्याच स्त्री (गायक नट) भूमिकाही केल्या.गुरूंच्या निधनानंतर गंधर्व मंडळींच्या नाटकांसाठी संगीत रचना करण्याचे काम मास्तर कृष्णरावांकडे आले. 'सावित्री', 'मेनका', 'आशा-निराशा', 'अमृतसिद्धी', 'संगीत कान्होपात्रा' यांसारख्या नाटकांना संगीत देताना मास्तर कृष्णराव त्यातील प्रमुख अभिनेत्यांना संगीत तालीम देत असत. बालगंधर्वही त्यांना गुरुस्थानी मानायचे.मास्तर कृष्णरावांनी 'धर्मात्मा', 'वहाँ', 'गोपाळकृष्ण', 'माणूस', 'अमरज्योती', 'शेजारी' यांसारख्या चित्रपटांनाही संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेल्या प्रभात कंपनी निर्मित या व इतर अनेक चित्रपटांतील गाणी खूप गाजली. त्यांनी एकूण १९ चित्रपटांना संगीत दिले. त्यात अत्रे फिल्म्सच्या गाजलेल्या 'वसंतसेना' चित्रपटाचा समावेश आहे तसेच माणिक चित्रसंस्थेच्या 'कीचकवध' चित्रपटाचा समावेश आहे. त्यांनी 'भक्तीचा मळा' व 'मेरी अमानत' चित्रपटांत भूमिकाही केल्या.संगीत जलशांचे कार्यक्रम करण्यासाठी मास्तर कृष्णरावांनी इ.स. १९२२ ते इ.स. १९५२ दरम्यान भारतभर सातत्याने दौरे केले. त्यांच्या आवाजातील लवचीकता, माधुर्य व आकर्षकपणा यांचा प्रभाव जनमानसावर लगेच पडत असे. त्यांच्या कार्यक्रमांना सर्वसामान्यांबरोबरच रसिक, दर्दी श्रोत्यांची विशेष पसंती व उपस्थिती असे. ते दुर्मिळ आणि लोकप्रिय रागांबरोबरच ठुमरी, नाट्यगीत, भजन व चित्रपटगीतेही प्रभावीपणे सादर करत असत. तसेच नव्या शक्यता पडताळून पाहणे, नवे प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती. त्यांनी रचलेले 'झिंजोटी' रागातील सामूहिकरीत्या गाता येण्यासारखे 'वंदे मातरम्' वाहवा मिळवून गेले. प्रसन्न, उठावदार व प्रभावी गायन शैलीने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत. त्यांनी गायलेल्या गाण्यांची व राग संगीताची ७८ आर पी एम ध्वनिमुद्रणेही प्रकाशित केली गेली.'वंदे मातरम्' हे गीत बॅन्डवर वाजवता येत नाही या सबबीखाली राष्ट्रगीत केले नाही याचे त्यांना फार वाईट वाटले. वंदे मातरम् अनेकानेक विविध चाली लावून, त्यातल्या काही बॅन्डवर वाजवता येतात हे दाखवण्यासाठी त्यांनी पंडित नेहरूंची भेट घेऊन व त्यांच्यासमोर संसदेत प्रात्यक्षिके देऊन त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. नेहरूंनी आधीच 'जन गण मन ' हे राष्ट्रगीत (National Anthem) म्हणून निश्चित केले असल्याने मास्तर कृष्णरावांची सर्व मेहनत फुकट गेली. परंतु 'वंदे मातरम्' ला पूर्णपणे न वगळता भारत सरकारतर्फे राष्ट्रीय गीत (National Song) म्हणून अधिकृत दर्जा देण्यात आला. या घटनेनंतर मास्तर कृष्णरावांनी संगीतबद्ध केलेल्या वंदे मातरम् ची रेकॉर्ड विविध शाळा-महाविद्यालये, अनेक वैयक्तिक व सार्वजनिक संस्था वगैरे ठिकठिकाणी कित्येक वर्षे वाजवली जात असे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनंतीवरून मास्तर कृष्णरावांनी संपूर्ण बुद्ध वंदना सांगीतिक मीटरमध्ये बसवली व बाबासाहेबांनी त्याची ध्वनिमुद्रिका काढली. याकरिता मास्तर कृष्णरावांनी पाली भाषेचा अभ्यास केला होता.१८९८ : नट व गायक कृष्णराव (फुलंब्रीकर) यांचा जन्म. (मृत्यू : २० ऑक्टोबर, १९७४)घटना :१७८८ : इंग्लडमधून हद्दपार केलेले गुन्हेगार वसाहतीसाठी ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या किनार्यावर उतरले. इथे वसाहत करण्यासाठी तयार झालेल्या गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्यात आली होती.१८४१ : युनायटेड किंगडमने हाँगकाँगचा ताबा घेतला.१९३७ : फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट यांनी अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. यानंतर २० जानेवारीलाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी करण्याची प्रथा पडली.१९४४ : दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्सने बर्लिन शहरावर २,३०० टन बॉम्ब टाकले.१९४८ : महात्मा गांधींची हत्या करण्याचा चौथा प्रयत्न झाला.१९५७ : आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित जवाहरलालनेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण करुन अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट (सध्याचे नाव भाभा अणुसंशोधन केंद्र) या संस्थेची स्थापना करण्यात आली.२००९ : अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी झाला.२०१९ : जगातील सर्वात वयोवृद्ध असलेले जपानचे मसाजो नोनाका यांचे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ११३ वर्षांचे होते. जपानमधील ओशोरे येथे ते राहात होते. मसाजो यांचा जन्म २५ जुलै १९०५ रोजी झाला होता.जन्म :१८६१ : मराठीमधील पहिल्या स्त्री कथा-कादंबतीकार, निबंधकार आणि सुधारक काशीबाई गोविंदराव कानिटकर यांचा जन्म. (मृत्यू : ३० जानेवारी , १९४८)१८७१ : टाटा घराण्यातील उद्योगपती सर रतनजी जमसेटजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू : ५ सप्टेंबर, १९१८)१८८९ : महान देशभक्त आणि तपस्वी मसुरकर महाराज यांचा जन्म.•मृत्यू :• १९५१ : समाजसेवक अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बाप्पा यांचे निधन. (जन्म : २९ नोव्हेंबर१८६९)• १९८० : दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण कस्तुरभाई लालभाई यांचे निधन. (जन्म : १९ डिसेंबर, १८९४)

Share: