आज संसदीय मंडळाच्या बैठकीत एनडीएच्या घटकपक्षातील सर्व नेते उपस्थित होते.
नवी दिल्ली, दि. ७ : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार स्थापन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता शपथ घेतील. यादरम्यान आज संसदीय मंडळाच्या बैठकीत एनडीएच्या घटकपक्षातील सर्व नेते उपस्थित होते. सर्व पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनुमोदन जाहीर केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संविधानाच्या प्रतिमेला डोकं टेकवून नमस्कार केला. “पुढच्या १० वर्षांनीही काँग्रेस १०० चा आकडा पार करू शकणार नाही. २०१४, २०१९ आणि २०२४ या तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसला जितक्या जागा मिळाल्या त्या सर्व जागा आम्हाला या एका निवडणुकीत मिळाल्या आहेत. इंडिया आघाडी पूर्वी हळूहळू बुडत होते. पण आता आणि मी स्वच्छपणे पाहू शकतो की इंडिया वाल्यांना अंदाज नाहीय की हळूहळू ते बुडत होते, आणि तेजीने ते गर्तमध्ये जाणार आहेत”, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.ही एनडीएची सर्वात यशस्वी आघाडी आहे. या आघाडीने पाच वर्षांचे तिन्ही टर्म यशस्वीपणे पूर्ण केली आहे आणि ही आघाडी चौथ्या टर्ममध्ये पदार्पण करीत आहे. राजकीय तज्ज्ञ मोकळ्या मनाने विचार केला तर एनडीए नेशन फर्स्टच्या प्रती कमिटेड आहे. संसदेतील कोणत्याही पक्षाचा प्रतिनिधी माझ्यासाठी समान आहे, त्याचमुळे गेल्या तीस वर्षांपासून एनडीए आघाडी मजबुतीने पुढे वाटचाल करतेय. एकमेकांना सोबत घेण्यात आम्हाला कमीपणा वाटत नाही. या निवडणुकीत दक्षिण भारतात एनडीएने एक नव्या राजकारणाचा पाया मजबूत केला आहे. गेल्या दहा वर्षात काँग्रेस शंभरचा आकडा गाठू शकलेली नाही. गेल्या तीन निवडणुकीत त्यांना मिळालेल्या जागा आम्हाला 2024 च्या एकाच निवडणुकीत मिळाल्या आहे. भारताच्या राजकीय व्यवस्थेत organic alliance आहे. अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, जॉर्ज फर्नांडिस यांसारख्या अनेक नेत्यांनी जे बीज रोवलं. आम्ही त्याचं सिंचन करीत वटवृक्ष उभा केला आहे. आपल्याकडे अशा महान नेत्यांचा वारसा आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू, एकनाथ शिंदे, अजित पवार, पवन कल्याण यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी मोदींना समर्थन दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाला अनुमोदन देत नितीश कुमार म्हणाले की, नरेंद्र मोदी दहा वर्षांनंतर पुन्हा पंतप्रधान झाले याचा आनंद आहे.