IMG-LOGO
राष्ट्रीय

पवार यांच्या भेटीगाठींचे लावले जाताहेत तर्क

Monday, Dec 28
IMG

शिवसेनेच्या मुखपत्रातून राहुल गांधी यांच्यावरही भाष्य करण्यात आले होते. राहुल काम करत आहेत; मात्र अजूनही त्यांच्या नेतृत्वात कमतरता आहेत.

विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घ्यायला पवारांकडून सुरुवातनवी दिल्ली, दि. २८ डिसेंबर  : शिवसेनेच्या मुखपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) नेतृत्व देण्याचा मुद्दा मांडण्यात आला. त्यानंतर दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पवार यांनी विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. या भेटींमागील कारण अद्याप स्पष्ट नाही; मात्र सध्या तरी या भेटीगाठींचा संबंध यूपीए अध्यक्षपदासाठीची मोर्चेबांधणी असाच लावला जाता आहे; परंतु त्यावर पवार यांनी अगोदरच स्पष्टीकरण दिले आहे.  शिवसेनेच्या मुखपत्रातून राहुल गांधी यांच्यावरही भाष्य करण्यात आले होते. राहुल काम करत आहेत; मात्र अजूनही त्यांच्या नेतृत्वात कमतरता आहेत. काँग्रेसला एक पूर्णवेळ अध्यक्षाची गरज आहे. याशिवाय सुंयक्त पुरोगामी आघाडीतही (यूपीए) गडबड आहे. विरोधी पक्षांना एकजूट करण्यासाठी नेतृत्वाची गरज आहे. अशात यूपीएमध्ये केवळ शरद पवार यांचे नेतृत्व दिसते. त्यांच्या अनुभवाचा उपयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्वजण घेतात, असे त्यात म्हटले होते. पवार यांनी मात्र यूपीए अध्यक्षपदात आपल्याला रस नसल्याचे स्पष्ट केले होते.शरद पवार दिल्लीत दाखल झाल्यानंतर पवार यूपीएच्या अध्यक्षपदाची मोर्चेबांधणी करणार असल्याच्या चर्चांनीही जोर धरला आहे. त्यामुळे पवारांच्या या दिल्लीवारीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. शेतकरी आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला आहे. या महिन्याभरात शेतकरी नेते आणि केंद्र सरकारच्या अनेक बैठकाही झाल्या; मात्र त्यात कोणताही तोडगा निघाला नाही. विरोधी पक्षनेत्यांनी राष्ट्रपतींना भेटून निवेदने दिल्यानंतरही शेतकरी आंदोलन सुरूच आहे. शिवाय मोदी यांनी दोन दिवसांपूर्वीच कृषी कायद्यांचे समर्थन करत विरोधकांनी भ्रमित केल्यामुळेच शेतकर्‍यांचं हे आंदोलन सुरू असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाचा तिढा सुटण्याची शक्यता धुसर झाली आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना एकत्र करण्यासाठी पवार दिल्लीत दाखल झाल्याचे सांगितले जात आहे.विरोधकांची आज बैठकशेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर सर्व विरोधकांना एकत्र करून सरकारवर हल्लाबोल करण्याच्या तयारीत पवार असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी पवार यांनी सर्व विरोधी पक्षांची उद्या दिल्लीत बैठक बोलावल्याचंही सूत्रांनी सांगितले. या बैठकीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि बसपच्या प्रमुख मायावती उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पवारांचा काँग्रेसला शह?शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर ही बैठक होत असली, तरी या माध्यमातून विरोधकांना आपल्या नेतृत्वाखाली एकत्र आणण्याचा पवार यांचा प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. मधल्या काळात यूपीएच्या अध्यक्षपदासाठी पवारांच्या नावाची चर्चा सुरू होती. त्यामुळे विरोधकांना एकत्र करून शेतकरी प्रश्‍नावर सरकारला कायदा मागे घेण्यास भाग पाडल्यास पवार यांचे विरोधी पक्षातील वजन आपोआपच वाढेल आणि यूपीएचे अध्यक्षपद त्यांच्याकडे देण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे पवारांनी विरोधकांची उद्या बोलावलेली बैठक ही काँग्रेसला एकप्रकारे शहच असल्याची चर्चा आहे.

Share: