मागच्या आठवड्यात १० एप्रिल रोजी जेव्हा खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली होती.
दिल्ली, दि. १६ : दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी गोत्यात आलेले पतंजली आयुर्वेदाचे प्रमुख योगगुरू बाबा रामदेव यांनी जनतेची माफी मागण्याची तयारी दाखवली आहे. सर्वोच्च न्यायालयानं त्यांना यासाठी एका आठवड्याची मुदत दिली असून या प्रकरणी पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजी होणार आहे.मागच्या आठवड्यात १० एप्रिल रोजी जेव्हा खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली होती, तेव्हा खंडपीठाने बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांची माफी स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर आज दोघांनीही जाहीर माफी मागण्यास तयार असल्याचे सांगितले. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) दाखल केलेल्या नोटिशीला उत्तर देताना त्यांनी ही बिनशर्त माफी मागितली होती. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अमानतुल्ला यांच्या खंडपीठासमोर आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने म्हटले की, तुम्ही चांगले काम करत असाल पण तुम्हाला ॲलोपॅथीला बदनाम करण्याचा अधिकार नाही. या सुनावणीवेळी न्यायालयात उपस्थित असलेल्या बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्या बिनशर्त माफीचीही दखल खंडपीठाने घेतली. कोरोनील औषधानं कोरोना बरा होतो असं सांगणारी शेवटची जाहिरात फेब्रुवारीमध्ये प्रसिद्ध झाली होती. मात्र, त्याआधीच तुम्हाला न्यायालयानं ताकीद दिली होती. तरीही ही जाहिरात का प्रसिद्ध केली गेली, असा प्रश्न न्यायाधीशांनी केला. त्यावर रामदेव बाबा गोंधळले. ‘आम्हाला कायदा इतका कळत नाही. यापुढं आम्ही हे लक्षात ठेवू आणि अशा चुका होणार नाहीत.