राहुल गांधी यांनी सेंट्रल विस्ट प्रकल्पावरून मोदी सरकारवर निशाणा साधला.
नवी दिल्ली, दि. ९ मे : देशात कोरोना महारोगराईचा उद्रेक सुरूच आहे. विविध राज्यातील रूग्णालयांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजन अभावी अनेक रूग्णांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता कॉंग्रेस नेते खासदार राहूल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘देश को पीएम आवास नहीं, सांस चाहिए’, असे ट्वीट त्यांनी केले आहे. राहुल गांधी यांनी सेंट्रल विस्ट प्रकल्पावरून मोदी सरकारवर निशाणा साधला. करोनामुळे हे काम रोखण्याची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. करोना स्थितीत केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी सेंट्रल विस्टा प्रकल्प गेल्या काही दिवसांपासून वादात अडकताना दिसत आहे. 'देश को पीएम आवास नहीं, सांस चाहिए', असं ट्वीट त्यांनी केलं आहे. ट्वीटमध्ये त्यांनी दोन तुलना करणारे फोटोही शेअर केले आहेत. त्यात एका बाजूला सेंट्रल विस्टा प्रकल्पाचं सुरु असलेलं काम आणि दुसऱ्या बाजूला करोना झालेले रुग्ण श्वासासाठी लढताना दाखवण्यात आले आहेत.