IMG-LOGO
लोकसभा २०२४

निवडणूका या ईव्हीएमशिवाय व्हाव्यात ही सर्वसामान्य जनतेची मागणी; संजय राऊत म्हणाले वंचितकडूनच चर्चेची दारे बंद

Wednesday, Apr 03
IMG

वंचित बहुजन आघाडीने तीन जागांचा प्रस्ताव दिला, असे ते सांगत असले तरी आम्ही त्यांना पाच जागांचा प्रस्ताव दिला होता.

मुंबई, दि. ३ : आम्ही वंचितसोबतची चर्चा बंद केली नाही तर त्यांच्या नेत्यांनीच चर्चा बंद केली, असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. वंचित चर्चा करीत नाही म्हणून आम्ही निवडणुका लढायच्या नाहीत काय, असा सवालही त्यांनी केला. देशातील निवडणूका या ईव्हीएमशिवाय व्हाव्यात ही सर्वसामान्य जनतेची मागणी आहे. भाजपमध्ये हिंमत असेल तर ईव्हीएमशिवाय निवडणूका घेऊन दाखवाव्यात, असे आव्हानही संजय राऊत यांनी दिले.वंचित बहुजन आघाडीने तीन जागांचा प्रस्ताव दिला, असे ते सांगत असले तरी आम्ही त्यांना पाच जागांचा प्रस्ताव दिला होता. अकोला, रामटेक, धुळे व मुंबईतील एका मतदारसंघाचा त्यात समावेश होता. आणखी एक जागा त्यांच्यासाठी राखून ठेवली होती. त्यामुळे आम्ही चर्चा केली नाही, असे त्यांनी म्हणू नये. देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुका ईव्हीएमशिवाय व्हाव्यात, देशात परिवर्तन हवे, अशी देशातील सर्वसामान्यांची भावना आहे. त्यामुळे ईव्हीएम विरोधात देशभरात आंदोलन सुरू आहेत. वकीलसुद्धा रस्त्यावर उतरले आहेत. निवडणूक आयोगाला मोठ्या प्रमाणात पत्र, निवेदन देण्यात आली. आता भाजपनेही ईव्हीएमशिवाय निवडणुका घेण्याची हिंमत दाखवावी,” असे आव्हान राऊत यांनी दिले.

Share: