चारित्र्यहणन करण्याचा प्रयत्न हिंडेनबर्गकडून केला जातो आहे, असा आरोपही त्यांनी केला.
दिल्ली, दि. ११ : सेबीच्या सध्याच्या अध्यक्ष माधवी बुच आणि त्यांचे पती या दोघांचे अदानी घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहारासाठी वापरलेल्या दोन्ही बनावट परदेशी फंडांमध्ये भागीदारी असल्याचा आरोप ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने केला आहे. त्यांच्या या आरोपांनंतर ता स्वत: सेबीच्या अध्यक्ष माधवी बुच यांनीही भाष्य केलं आहे.हिंडेनबर्ग रिसर्चने १० ऑगस्ट रोजी आमच्या संदर्भात जे आरोप केले, ते सर्व निराधार आहेत. त्यांनी केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. आमच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित सर्व कागदपत्रे आम्ही सेबीकडे सादर केली आहेत. याशिवाय सेबीच्या अध्यक्ष होण्यापूर्वीची कागदपत्रेही जाहीर करण्यात आम्हाला कोणताही संकोच नाही, असे त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे. तसेच यापूर्वी सेबीने हिंडेनबर्ग रिसर्चवर कारवाई केली आहे. त्यामुळेच आमच्या चारित्र्यहणन करण्याचा प्रयत्न हिंडेनबर्गकडून केला जातो आहे, असा आरोपही त्यांनी केला.