IMG-LOGO
राष्ट्रीय

Hindenberg रिपोर्टनंतर शेअर मार्केट 300 अंकांनी घसरले

Monday, Aug 12
IMG

सेंसेक्स आणि निफ्टी थेट अर्ध्या अर्ध्या टक्क्यांनी खाली आला. सेंसेक्स साधारण 300 अंकानी घसरुन व्यवहार करत होता.

मुंबई, दि. १२ : शेअर मार्केटमध्ये हिंडनबर्ग रिपोर्टच्या भीतीने भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. शनिवारी 10 ऑगस्ट रोजी हिंडनबर्ग रिसर्च रिपोर्ट समोर आला. यामध्ये सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांचे अदानी ग्रुपशी आर्थिक संबंध असल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला. आज सोमवारी बाजार खुला झाल्यावर भारतीय शेअर मार्केटवर याचा परिणाम दिसून आला. शेअर बाजार उघडताच 300 अंकांनी घसरला आहे तर निफ्टी 100 अंकांनी घसरला.हिंडनबर्गचा आरोपानंतर शेअर बाजारात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. गुंतवणूकदारांना जास्त जोखीम न घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.  सेंसेक्स आणि निफ्टी थेट अर्ध्या अर्ध्या टक्क्यांनी खाली आला. सेंसेक्स साधारण 300 अंकानी घसरुन व्यवहार करत होता. तर निफ्टी 24 हजार 300 च्या जवळ ट्रेड करत होता. बाजार 74 टक्के बेरीश होता. बाजाराची घंटी वाजताच सेंसेक्स 375 अकांनी कोसळून 79 हजार 330 वर खुला झाला. निफ्टी 47 अकांनी कोसळून 24 हजार 320 वर खुला झाला. बॅंक निफ्टी 72 अकांनी घसरुन 50 हजार 412 वर खुला झाला. अदानी ग्रुपच्या शेअर्सवर याचा परिणाम दिसून आला. अदानींच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण पाहायला मिळाली. 

Share: