काही आमदारांनी पक्ष सोडला, म्हणून काही फरक पडत नाही, जनता आमच्याबरोबर आहे. तुम्ही काही आमदारांना विकत घेऊ शकता.
ममता बॅनर्जी यांचे आव्हान; भाजपच्या नेत्यांवर टीकाकोलकाता, दि. २९ डिसेंबर : मिदनापूर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी गेल्या आठवड्यात ज्या बीरभूम जिल्ह्यात टोलेजंग रॅली काढली, त्याच जिल्ह्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी रॅली काढून भाजपच्या आव्हानाला तितकेच सडेतोड उत्तर दिले. बॅनर्जी यांनी आज (मंगळवार) बीरभूम जिल्ह्यात पदयात्रा काढली होती. त्यानंतर त्यांनी एका सभेत बोलताना भाजपवर हल्ला चढवला. भाजपने बंगालमध्ये 30 जाग जिंकून दाखवाव्यात, असे आव्हान त्यांनी दिले. भाजपने दोनशे जागा जिंकण्याचे स्वप्न नंतर पाहावे, अगोदर 30 जागाच जिंकून दाखव्यावत असे ममता यांनी म्हटले आहे. याशिवाय भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांच्या दौ-यावरूनही त्यांनी या वेळी निशाणा साधला. भाजप नेते दर आठवड्याला येतात. पंचातारांकित हॉटेलमध्ये जेवण करतात; मात्र दाखवतात असे, की जसे आदिवासीच्या घरी जेवण करतात, अशी टीका त्यांनी केली. तसेच, आम्ही वर्षाचे 365 दिवस गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या सोबत आहोत; मात्र भाजप दररोज खोटे व्हिडिओ पसरवून समाजात तेढ निर्माण करत आहे. जे लोक महात्मा गांधी आणि देशाच्या अन्य महापुरुषांचा सन्मान करत नाहीत, ते ‘सोनार बांगला’ बनवण्याच्या गप्पा मारत आहेत, असा टोला ममता यांनी भाजपला लगावला. काही आमदारांनी पक्ष सोडला, म्हणून काही फरक पडत नाही, जनता आमच्याबरोबर आहे. तुम्ही काही आमदारांना विकत घेऊ शकता; मात्र तृणमूल काँग्रेसला नाही विकत घेऊ शकत, असे सांगून ममता यांनी भाजप केंद्रीय संस्था व पैशांच्या बळावर बंगालमध्ये घुसू इच्छित आहे; मात्र त्यांना यामध्ये यश येणार नसल्याचे सांगितले.