राहुल गांधी यांनीही पंतप्रधानांनी काय बोलावं याबाबत ट्विट केले होते. काही मिनिटांमध्येच हे ट्विट सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.
नवी दिल्ली, दि. २० ऑक्टोबर : सायंकाळी 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. तत्पूर्वी राहुल गांधी यांनीही पंतप्रधानांनी काय बोलावं याबाबत ट्विट केले होते. काही मिनिटांमध्येच हे ट्विट सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'आपल्या सहा वाजताच्या संदेशात कृपया देशाला तारिख द्या की, तुम्ही चीनला भारताच्या बाहेर कधी काढणार.' असे ट्विट राहुल गांधी यांनी शेअर केले होते. हे ट्विट काही मिनिटांमध्येच अनेकांनी शेअर केले आहे.