IMG-LOGO
नाशिक शहर

गंगापूर धरणातून १ हजार ५०० क्यूसेक विसर्ग, सतर्कतेचा इशारा

Sunday, Aug 23
IMG

पावसाची संततधार कायम असल्याने गंगापूर धरणाची पाणीपातळी सातत्याने वाढत असून धरणात ९३.३३ टक्के जलसाठा आहे.

नाशिक, दि. २३ ऑगस्ट : गंगापूर धरणातून आज (दि.२३) दु. १ वाजता ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येत असून दु. ४ वाजेपर्यंत हा पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवत १५०० क्‍युसेकपर्यंत करण्यात येईल. अशी माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे.  दरम्यान पावसाची संततधार कायम असल्याने गंगापूर धरणाची पाणीपातळी सातत्याने वाढत असून धरणात ९३.३३ टक्के जलसाठा आहे.  पाण्याचा विसर्ग कमी असल्यामुळे कुठेही पुराची शक्यता नाही. परंतु आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने कृपया कोणीही नदीपात्रात जाऊ नये. पाण्याची पातळी अचानक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Share: