मराठी व्यावसायिक उद्योजकांना आणि नोकरी करणाऱ्यांसाठी सर्वात मोठा मेळावा इथे होत आहे.
नाशिक, दि. २० : बृहन्महाराष्ट्र मंडळाचे २०२४ चे अधिवेशन २६ ते ३० जून दरम्यान सॅन होजे, कॅलिफोर्निया येथे होणार आहे. उत्तर अमेरिकेतील बदलत्या मराठी समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे मंडळ सतत कार्यरत आहे. या अधिवेशनामध्ये विविध सांस्कृतिक प्रदर्शनाचे कार्यक्रम होणार आहेत ह्याच सोबत ह्या अधिवेशनाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे बी कनेक्ट यामध्ये उत्तर अमेरिकेतील सगळ्या मराठी व्यावसायिक उद्योजकांना आणि नोकरी करणाऱ्यांसाठी सर्वात मोठा मेळावा इथे होत आहे. बी कनेक्ट चा उगम महाराष्ट्रीयन व्यावसायिकांना त्यांच्या यशाच्या प्रवासात सक्षम आणि उन्नत करण्याच्या सामूहिक इच्छेतून झालेला आहे. बी कनेक्ट ची स्थापना समीर अहिरराव व विराज राऊत यांच्या संकल्पनेतून आणि संदीप दीक्षित व सुनील सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनातून 2022 मध्ये झाली.ह्या अधिवेशनामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी भारतातून फाउंडर चेअरमन पर्सिस्टंट सिस्टम्स आनंद देशपांडे , बीव्हीजी सिस्टम्स चेअरमन हनुमंतराव गायकवाड, फाउंडर चेअरमन के पी आय टी सिस्टम्सचे रवी पंडित असे अनेक मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.या परिषदेमध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी विविध विविध क्षेत्रातील नोकरी व व्यवसायाच्या संधी, जॉब फेअर रिझ्युमे मेकिंग वर्कशॉप याबद्दल तज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच या परिषदेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, सेमीकंडक्टर यातील संधी विषयांवर चर्चासत्र ही आयोजित केलेली आहेत. मराठी महिला उद्योजकांसाठी काही विशेष चर्चासत्रे पण आयोजित केलेली आहेत.बी कनेक्ट चे अजून एक आकर्षण म्हणजे इथे नवीन मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे नाविन्यपूर्ण उद्योग संकल्पनेला तिथे उपस्थित असलेल्या भांडवलदार, गुंतवणूकदार यांच्याकडून उद्योजकांना आर्थिक सहाय्य देण्याची संधी उपलब्ध आहे. बी कनेक्ट परिषदेमध्ये सर्व मराठी बांधवांनी मोठ्या प्रमाणावरती सहभाग घ्यावा व संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन या परिषदेचे नेतृत्व करणारे श्री विराज राऊत, श्री समीर अहिरराव व श्री सचिन ओहोळ यांनी केले आहे. ही परिषद यशस्वी करण्यासाठी संपूर्ण अमेरिकेतून अनेक मराठी उत्साही कार्यकर्ते केदार कुलकर्णी, शलाका खर्चे, तेजस सर्वणकर, निलेश दीक्षित, अद्वैत कुलकर्णी, वैशाली वाघ, ऋजुता ढेरे, रोहन रासने कार्यरत आहेत व मराठी समाजाला वेगळ्या स्तरावरती घेऊन जाण्यास प्रयत्नशील आहेत.बी कनेक्ट परिषदेची अधिक माहिती या अधिकृत वेबसाईट वर मिळू शकते- https://bconnect.bmmonline.org