IMG-LOGO
नाशिक शहर

विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत २१ उमेदवार; महायुतीत फुट

Thursday, Jun 13
IMG

बंडखोरी आणि नामसाधर्म्य असणाऱ्यांची उमेदवारी हे प्रमुख राजकीय पक्षांसमोर आव्हान ठरले.

नाशिक, दि. १३ :  विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून १५ उमेदवारांनी माघार घेतली असून आता रिंगणात २१ उमेदवार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे, शिवसेना ठाकरे गटाचे ॲड. संदीप गुळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर भावसार यांच्यासह धोंडीबा भागवत, अनिल तेजा, अमृतराव उर्फ अण्णासाहेब शिंदे, इरफान इसहाक, भाऊसाहेब कचरे, विवेक कोल्हे, सागरदादा कोल्हे, संदीप कोल्हे, गजानन गव्हारे, संदीप गुरुळे, सचिन झगडे, डॉ. छगन पानसरे, रणजित बोठे, महेश शिरुडे, रतन चावला, आर. डी. निकम संदीप गुळवे (पाटील) यांचा समावेश आहे. निवडणुकीतून संदीप गुळवे, शेख मुख्तार अहमद, रुपेश दराडे, कुंडलिक जायभावे, दत्तात्रय पानसरे, रखमाजी भड, सुनील पंडित, बाबासाहेब गांगर्डे, अविनाश माळी, निशांत रंधे, दिलीप पाटील, डॉ. राजेंद्र विखे-पाटील, धनराज विसपुते आणि प्रा. तानाजी भामरे या १५ जणांनी माघार घेतली. बंडखोरी आणि नामसाधर्म्य असणाऱ्यांची उमेदवारी हे प्रमुख राजकीय पक्षांसमोर आव्हान ठरले. अपक्ष उमेदवार डॉ. राजेंद्र विखे-पाटील यांच्या माघारीसाठी त्यांचे बंधू महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रयत्न केले. काँग्रेसचे उमेदवार दिलीप पाटील यांच्या माघारीसाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून विनंती केली. भाजपचे धनराज विसपुते यांनी रिंगणातून माघार घेतली असली तरी भाजपशी संबंधित विवेक कोल्हे यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. राज्यात सत्ताधारी असणाऱ्या महायुतीत या निवडणुकीत फूट पडली. शिवसेना (शिंदे गट) जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत उमेदवार उभा केला आहे. 

Share: