IMG-LOGO
जीवन शैली

पोटाच्या तक्रारी

Friday, Oct 23
IMG

पोटाचे आजार होणाऱ्यांमध्ये १८ ते ४० वर्षे वयोगटातील रुग्णांचा समावेश अधिक आहे. बदललेल्या जीवनशैलीबरोबरच चहा, कॉफी, मद्याच्या अतिसेवनामुळे पचनक्रियेसंबधी विकारांमध्ये वाढ होत आहे.

बहुतांश आजार हे पोटाच्या तक्रारीपासूनच सुरू होतात. म्हणून पोटाचे आरोग्य खुप महत्वाचे ठरते. पोटदुखी, पोट साफ न होणे, गॅस, अपचन, ढेकर या सामान्य समस्या असल्या तरी यावर वेळीच उपाय केले पाहिजेत.  पोटाचे आजार होणाऱ्यांमध्ये १८ ते ४० वर्षे वयोगटातील रुग्णांचा समावेश अधिक आहे. बदललेल्या जीवनशैलीबरोबरच चहा, कॉफी, मद्याच्या अतिसेवनामुळे पचनक्रियेसंबधी विकारांमध्ये वाढ होत आहे. चयापचय प्रक्रियेत व्यत्यय, चुकीचा आहार, मानसिक ताणाव यांचा थेट परिणाम पचनक्रियेवर होताना दिसून येतो. पोट चांगले असेल तर माणूस स्वस्थ असतो. पण बरेच वेळा बाहेरचे पदार्थ खाणे, बाहेरचे पाणी पिणे, जास्त पिक लेली फळे खाणे, खराब झालेले अथवा शिळे अन्न आहारात घेणे, पावसाळ्याचे दिवस असतील तरी पोटात दुखण्याच्या तक्रारी बरेच वेळा ऐकायला येतात. पोटात दुखण्याची अनेक कारणे असू शकतात. उतारवयात पोटातल्या सर्व अवयवांची क्षमता कमी होते. त्यामुळे संबंधित व्यक्ती एका वेळी खूप अन्न पचवू शकत नाही.  छातीच्या पोकळीत असणारी अन्ननलिका व पोटातील जठर यामध्ये एक द्वार असते. उतारवयात या द्वाराचे स्नायू  शिथिल  होतात.  मंदावलेली आतडी, घटलेले पाचक रस यामुळे अपचन होत राहते व औषधांना प्रतिसाद पण कमी मिळतो. गॅस आहे? सोडा घे, पोट दुखतंय? ओवा खा, हिंगाचं पाणी घे, हे एखाद्या वेळी ठीक. पण सतत पोट दुखायचा त्रास होत असेल तर घरगुती औषधोपचारांवर अवलंबून राहू नये. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Share: