IMG-LOGO
नाशिक शहर

ATS ची मोठी कारवाई ! 'आयएसआय'ला गोपनीय माहिती देणारा अटकेत

Friday, Oct 09
IMG

नाशिक स्थित भारतीय बनावटीची विमाने बनविणाऱ्या "हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड " या कंपनीमधील एक कर्मचारी दीपक शिरसाटकडे ५ सिमकार्ड आणि ३ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

नाशिक, दि. ०९ ऑक्टोबर :   पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयला गोपनीय माहिती पुरवणाऱ्या तरुणाला नाशिक येथून अटक करण्यात महाराष्ट्र एटीएसच्या पथकाला यश आलं आहे. गुप्त माहिती पुरविणारा  'एचएएल'चा कर्मचारी असल्याचे प्रार्थमिक माहितीत निष्पन्न झाले आहे. दहशतवादी विरोधी पथकाला (एटीएस), नाशिक युनिटला या संदर्भात गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.नाशिकच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमीटेड विमान कंपनीत हा तरूण कार्यरत होता. फायटर एअर क्राफ्टसह गोपनीय जागांच्या छायाचित्राची माहिती त्यानं पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISIला पाठवल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या ४ दिवसांपूर्वी संशयिताला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याच्याकडे चौकशी केली असता ही माहिती समोर आली आहे.  ओझर, नाशिक स्थित भारतीय बनावटीची विमाने बनविणाऱ्या "हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड " या कंपनीमधील एक कर्मचारी दीपक शिरसाटकडे  ५ सिमकार्ड आणि ३ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. मोबाईल आणि सिमकार्ड तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवलेले आहेत. आरोपीला १९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संवेदनशील माहिती आणि एचएएल या विमान कारखान्यासंदर्भातील गोपनीय माहिती परदेशी व्यक्तीस पुरवत असल्याची खबर लागली होती. 

Share: