ऑनलाईन अर्ज करताना शेतकऱ्यांनी सातबारा उतारा, खाते उतारा, मागासवर्गीयांसाठी जातीचा दाखला अपलोड करणे आवश्यक आहे.
नाशिक दि. ०८ ऑक्टोबर : राज्य शासनाच्या कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकी व इतर योजनांसाठी जिल्ह्यातील महाडीबीटी या शासकीय पोर्टलवर अधिकृत ग्राहक सेवा केंद्रातून ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी आर. डी. वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे .या पत्रकान्वये ट्रॅक्टर, मळणीयंत्र, कापणीयंत्र, रोटाव्हेटर, मिनी राईस मिल, पॉवरट्रेलर, फवारणी यंत्र, फलोत्पादन योजनेत कांदा चाळ, पॅक हाऊस, जुन्या फळबागांचे पुनरुजीवन, फळबाग लागवड, मधुमक्षिका पालन, हरितगृह, शेडनेट ,शेततळे प्लास्टिक मल्चिंग, राष्ट्रीय कृषि विकास योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका आदी योजनांसाठी शेतकरी अर्ज करू शकतात.ऑनलाईन अर्ज करताना शेतकऱ्यांनी सातबारा उतारा, खाते उतारा, मागासवर्गीयांसाठी जातीचा दाखला अपलोड करणे आवश्यक आहे. शासनाने ठरवून दिलेल्या लक्षांकापेक्षा जास्त मागणी अर्ज प्राप्त झाल्यास त्यांची पडताळणी करून लकी ड्रॉ पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी कृषि विभागाकडे अर्ज सादर केले आहेत त्यांनीही ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तसेच योजनांच्या अधिक माहितीसाठी कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधवा असे तालूका तालुका कृषि अधिकारी आर. डी. वाघ यांनी केले आहे.