IMG-LOGO
नाशिक शहर

महिला अत्याचारांबाबत झोपलेल्या राज्य सरकारला जागे करण्यासाठी भाजपाचे आंदोलन

Tuesday, Oct 13
IMG

राज्यात लॉकडाऊनच्या कालावधीत महिलांची मानसिक कोंडी व छळ होत असल्याच्या तक्रारी मोठ्या संख्येने वाढल्या आहेत.

हाथरसमधील घटनेने सारा देश हादरला असून पुन्हा एकदा महिला अत्याचारांबाबतचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. हाथरसमधील घटनांची पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये होऊ नये यासाठी आज महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे व भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व महिला मोर्चा प्रभारी प्रा.आ.देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याबाबत २२ सप्टेंबर रोजी सरकारला  सर्व पोलीस स्टेशनच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले होते मात्र या निवेदनाची सरकारने कोणतीही दखल घेतलेली नाही.राज्यात लॉकडाऊनच्या कालावधीत महिलांची मानसिक कोंडी व छळ होत असल्याच्या तक्रारी मोठ्या संख्येने वाढल्या आहेत. मात्र, तरीही गेल्या आठ महिन्यांपासून राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त आहे. पंधरा दिवसांच्या मुदतीत मुंबई उच्च न्यायालयाने आदेश देऊनही राज्य सरकारला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करता आलेली नाही. राज्यामध्ये 'दिशा' कायदा राबविण्याची  घोषणा करण्यात आली होती. याबाबत राज्याच्या गृहमंत्र्यांनी मार्च महीन्यात महीला आमदारांची बैठक घेउन १५ दिवसात कायदा करण्याचे आश्वासन दिलेले होते आज सहा महिन्या पेक्षा जास्त कालावधी होऊन या बाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. याबाबत सरकारची उदासीनता निदर्शनास येत आहे. अनेक महिला अत्याचाराच्या प्रकरणात बहुतेक ठिकाणी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती झालेली नाही. तसेच महिला अत्याचाराच्या प्रकरणात द्रूतगती न्यायालयात (फास्ट ट्रक कोर्ट) चालविण्याची आवश्यकता असताना, त्याकडे राज्यसरकारने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आज भाजपा महिला आघाडीच्या वतीने भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रा.आ. देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वात शहरातील साईनाथ नगर चौफुली व अशोकस्तंभ येथे महिलांची साखळी करून झोपलेल्या सरकारला जागे करण्याकरिता आंदोलन करण्यात आले.यावेळी भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे, ज्येष्ठ नेते सुनील बागुल, महिला मोर्चा नाशिक शहराध्यक्षा सौ. हिमगौरी आडके, महाराष्ट्र  महिला मोर्चा उपाध्यक्ष सौ. संध्या कुलकर्णी,  महिला मोर्चा महाराष्ट्र चिटणीस सौ. रोहिणी नायडू,प्रशांत जाधव,पवन भगूरकर, सुनिल देसाई,भास्कर घोडेकर,उदय जोशी,अतुल क्षिसागर,तुषार जोशी, सभागृह नेते सतिशजी बापू सोनवणे,नगरसेवक चंद्रकांत खोडे,यशवंत निकोळे, सुप्रिया खोडे,शाम बडोदे,सचिन कुलकर्णी, दिपाली कुलकर्णी,रुपाली निकोळे,अर्चना थोरात,पुष्पा आव्हाड,चंद्रकांत थोरात, संजय नवले,साहेबराव आव्हाड एकनाथ नवले, उत्तम उघाडे,भुषण काळे,दिपक देव, संतोष करंकल,प्रकाश गोले, महिला मोर्चा अध्यक्ष स्वाती वटारे,रूपाली नेर,राजश्री भावसार,,सोनाली कुलकर्णी,राजश्री शौचे,राम बडोदे,संजय केळकर,भानुदास शौचे,सुनीता यादव,रुपाली मर्चंडे, सुमनताई विश्वकर्मा,दत्ता शिंदे, विनायक कस्तुरे,नगरसेवक शाहीन मिर्झा,मुझम्मील मिर्झा,मिलिंद भालेराव,रफिक शेख,योगेश घुगे,अमोल दोंदे,विजय काळे,संजय काळे,गणपत वारडे,नगरसेवक अनिल ताजनपुरे,सुमन भालेराव,विद्या देव,अनिता पारखे,मंजुषा पत्की,ज्योती वाईकर,रेणुका मराठे,शोभा सोनवणे, अरुण जगताप,सीमा देशपांडे, स्नेहा मोडक, सुनीता यादव.नगरसेविका स्वाती भामरे,अनिकेत सोनवणेआदींसह भाजप पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या उपस्थितीत होत्या.

Share: