शहर व परिसरातील असंख्य पर्यावरण प्रेमी या मोहिमेत सहभागी होत आहेत.
नाशिक, दि. १३ जून : नंदिनी नदी पुनरज्जीवन व संवर्धन अभियान अंतर्गत दि.24 जून रोजी वटसावित्री पोर्णिमेच्या मुहूर्तावर भाजपातील पर्यावरण प्रेमी महिला राबविणार तीन हजार वृक्षरोपणाची मोहिम राबविणार असल्याची माहिती लक्ष्मण सावजी व पर्यावरण मंच प्रमुख उदय थोरात यांनी दिली.पर्यावरण प्रेमींनी नंदिनी नदीला गतवैभव प्राप्त व्हावे म्हणून नंदिनी नदीच्या दोन्ही बाजूने नदी प्रदूषण मुक्त व्हावी यासाठी नंदिनी नदीच्या तळेगांव (अंजनेरी) येथील उगमस्थानापासून ते टाकळी येथील संगमस्थानापर्यंत दुतर्फा पर्यावरण प्रेमींची तसेच शहरातील पर्यावरण प्रेमी, पर्यावरण प्रेमी एन.जी.ओ. व नाशिक महानगरपालिका यांच्या सयूंक्त विद्यमाने प्रदूषण मुक्त नंदिनीसाठी पर्यावरण संरक्षण चळवळीने जोर पकडला आहे. भाजप पर्यावरण आघाडी, शहरातील असंख्य एन.जी.ओ., शहर व परिसरातील असंख्य पर्यावरण प्रेमी या मोहिमेत सहभागी होत आहेत. पिंपळगाव बहुला ते टाकळी दरम्यान महापालिकेच्या व पर्यावरण प्रेमी स्वयंसेवक, भाजप पर्यावरण मंचच्या माध्यमातून प्रथम टप्प्यात नंदिनी नदीला कचरा व प्रदूषण मुक्त करण्यासाठी वेगाने काम सुरू असल्याचे माहिती नंदिनी नदी पुनरज्जीवन व संवर्धन अभियान प्रमुख, भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी दिली. ते बोलताना पुढे म्हणाले की नाशिक शहर व परिसरातील पर्यावरण प्रेमी संघटना, भाजप पर्यावरण आघाडीचे कार्यकर्ते यांचा उत्साह बघता संपूर्ण देशभरात आदर्श ठरेल व देशभरातील पर्यावरण तज्ञ नाशिक शहराचा कणा असलेली प्रदूषण मुक्त व नाशिककारांचे आकर्षण बनलेली प्रदूषण मुक्त नंदिनी बघायला येतील असेही सावजी पुढे म्हणाले.नुकतीच सातपूर येथे नंदिनी नदीच्या पंचक्रोशीत कोरोना नियमांचे पालन करून मोजक्याच पर्यावरण प्रेमीच्या उपस्थितीत वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी दि. २४ जून रोजी होत असलेल्या वृक्षारोपणाच्या उपक्रमाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत भाजप शहर अध्यक्ष गिरीश पालवे, भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, आ. सीमा हिरे, भाजप शहर संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, जगन अण्णा पाटील, सिनेअभिनेते चिन्मय उदगीरकर, राजेश पंडित, पर्यावरण मंच प्रमुख उदय थोरात, नगरसेवक दिनकर अण्णा पाटील, अजिंक्य साने, हिमगौरी आडके, माधुरी बोलकर, वर्षा भालेराव, प्रतिभा पवार, सातपूर मंडळ अध्यक्ष अमोल इगे , प्रा. कुणाल वाघ, संदीप इंजिनिअरिंग कॉलेज चे प्राचार्य प्रशांत पाटील, सिडको २ मंडळ अध्यक्ष अविनाश पाटील, द्वारका मंडळ अध्यक्ष सुनील देसाई, उदय जोशी, रामहरी संभेराव, ललिता बिरारी, हर्षा फिरोदिया, रश्मी बेेंडाळे, मंगला खोटरे, मंगेश नागरे, निलेश भंदुरे, अनिल भालेराव, नंदकुमार देसाई, सातपूर प्रभाग सभापती रवींद्र ढिवरे, बेळगाव ढगा सरपंच दत्तू ढगे, चारुदत्त आहेर भगवान काकड, संगीता शेळके, तिरडशेत सरपंच अमित बोकड, मंगला खोटरे, शिल्पा पारनेरकार आदी या नियोजनाच्या बैठकीस हजर होते, या बैठकीस सुरवातीला उपक्रम प्रमुख लक्ष्मण सावजी यांनी नंदिनी प्रदूषण मुक्त च्या उपक्रमाची माहीती दिली, आ.सीमा हिरे यांनी नंदिनी नदीच्या गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने भाग घ्यावा असे सांगितले, चिन्मय उदगीरकर यांनी आपण या मोहिमेच्या जनजागरण साठी हिरहिरीने भाग घेऊ असे सांगितले, दिनकर अण्णा पाटील यांनी वृषारोपन झाल्यावर वृक्ष संवर्धनासाठी योग्य त्या उपाय योजना राबविणासाठी नियोजन करण्यात यावे यासाठी आपण सर्वोत्तपरी सहकार्य करू असे सांगितले. प्रास्तविक भाजप पर्यावरण मंच प्रमुख उदय थोरात यांनी केले सूत्रसंचलन चारुदत्त आहेर यांनी केले. तर आभार भगवान काकड यांनी मानले.