IMG-LOGO
नाशिक शहर

समता सैनिक दलातर्फे नाशिकमध्ये रक्तदान शिबिर

Sunday, Dec 06
IMG

या राज्यस्तरीय रक्तदान शिबिरात तब्बल ५०० रक्ताचे युनिट ज्या ११ ठिकाणी रक्तदान शिबीर संपन्न झाले. पुढच्या वेळी हा आकडा आपण १००० च्या वर घेऊन जाण्याचा प्रयत्न करू असा मानस समता सैनिक दलामार्फत व्यक्त करण्यात आला.

नाशिक, दि. ६ डिसेंबर : आज विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी समता सैनिक दल, संस्थापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आयोजित राज्यस्तरीय रक्तदान शिबिर नाशिक, पुणे, सातारा, उस्मानाबाद, पिंपरी चिंचवड, चिखली, दापोडी, स्वारगेट, ताडीवाला रोड, बाबवेवडी, हडपसर येथे पार पडले. लाखोंचा भीमसागर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे दरवर्षी जात असतो मात्र यंदा भीमसैनिकांना चैत्यभूमीवर जाता आला नाही. कोरोना महामारी सोबत संपूर्ण जग लढत आहे. संपूर्ण राज्यात ३४४ रक्तपेढ्यांमध्ये १९ हजार ०५९  रक्ताच्या युनिट व प्लेटलेट् च्या २५८३ युनिट, मुंबईतील ५८ रक्तपेढ्यांमध्ये ३२४१ रक्ताच्या युनिट व ६११ प्लेटलेट्स युनिट, नाशिक मध्ये १२ रक्तपेढ्या आहेत त्यात ३५० रक्ताच्या युनिट व २०० प्लेटलेट्स युनिट इतका कमी रक्तसाठा शिल्लक आहे आणि हा रक्तसाठा फक्त ५ ते ७ दिवस पुरेल इतकाच आहे. ही परिस्थिती लक्षात घेत समता सैनिक दलामार्फत रक्तदान शिबीर कोरोना नियमांचे पालन करत पार पडले. या राज्यस्तरीय रक्तदान शिबिरात तब्बल ५०० रक्ताचे युनिट ज्या ११ ठिकाणी रक्तदान शिबीर संपन्न झाले. पुढच्या वेळी हा आकडा आपण १००० च्या वर घेऊन जाण्याचा प्रयत्न करू असा मानस समता सैनिक दलामार्फत व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन एका ट्रान्सजेंडर च्या हस्ते करून त्यांनाही समाजप्रवाहात सामील करून घेण्याचे आवाहन समता सैनिक दलामार्फत करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे जयवंतराव खडताळे, मायको फोरमचे राजीव नाईक, सिद्धान्त मीडियाचे संचालक विश्वास देवकर, प्रेमनाथ सोनवणे, अ‍ॅड. यतीश देसले आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  समता सैनिक दलामार्फत संतोष आंभोरे, हृषीकेश चव्हाण, व अनिकेत चव्हाण आदींनी संयोजन केले. 

Share: