जुने नाशिक भद्रकाली परिसरात जनजीवन पूर्ववत सुरू असल्याचे दिसले.
नाशिक, दि. १७ : सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंच्या अत्याचाराविरोधात मोर्चा काढला होता, या मोर्चाला जुने नाशिक परिसरात गालबोट लागले. नाशिक मध्ये दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी २०० जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे. शुक्रवारी (दि. १६) दुपारी दीड वाजेच्या सुमारास जुने नाशिक भद्रकाली परिसरात दोन गटांमध्ये दगडफेक झाली होती आता याप्रकरणी २०० जणांवर गुन्हा दाखल झाला असून ५५ जणांवर जीवे ठार मारण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान दंगलीत दहा पोलीस अधिकाऱ्या कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली होती त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले. शनिवारी (दि.१७ ) जुने नाशिक भद्रकाली परिसरात जनजीवन पूर्ववत सुरू असल्याचे दिसले.