आता कोरोना काळात शरीरात प्रतिकारशक्ती वाढविण्याची गरज आहे. धुम्रपान करून प्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणावर कमी होत आहे.
‘धुम्रपान करणे आरोग्यास घातक आहे’, ‘तंबाखूने कर्करोग होतो’ हे आपल्याला जागोजागी वाचायला मिळते. खरंतर हे अशी व्यसनं करणाऱ्या लोकांना वेळीच सावध करण्यासाठी लिहीलेले असते. पण त्याचा कितीसा फायदा होतो?आता कोरोना काळात शरीरात प्रतिकारशक्ती वाढविण्याची गरज आहे. धुम्रपान करून प्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणावर कमी होते हे धूम्रपान करणाऱ्यांनी लक्षात ठेवायला हवं, उलट अशा ठिकाणीही काय लिहिलेय याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून तिथेच सिगारेटचे झुरके मारणारे, पिचकाऱ्या मारणारे कित्येक बहाद्दर असतात. व्यसन हे दारूचे असो, सिगारेट अथवा तंबाखूचे, त्याचा आपल्या शरीरासह मनावर विपरीत परीणाम झाल्याशिवाय राहत नाही. नशा केल्याने आपले गुण नष्ट होतातच तर आत्मा आणि शरीर या दोघांनाही हळू- हळू नष्ट होत असतात. दारू, सिगारेट, तंबाखू हे 'स्लो पॉयझन' असे जरी आपण म्हटलो तर ते वावगे ठरणार नाही. सध्याच्या आधुनिक युगात तर तरूणाईच्या जगण्याच्या कल्पना बदलत चालल्या आहेत. त्यात व्यसनाधिन तरूणांचं वाढतं प्रमाण अधिक चिंताजनक आहे. सिगारेट किंवा तंबाखूचं व्यसन असणारे अनेक तरूण आपल्याला आजुबाजुला पहायला मिळतात. अलिकडे तर तरूणींही धुम्रपान करू लागल्या आहेत. सिगरेटच्या पाकिटावर इशारा लिहिलेला असतो. पण तरीही सिगरेट ओढताना आपण पाहतो व्यसन कसे सोडवावा असा प्रश्न अनेकांना पडतो तर त्यावर एकच उपाय समोर येतो तो म्हणजे जेव्हाही सिगरेट ओढण्याची इच्छा होईल तेव्हा मनाची समजूत घाला की 'मला काहीही करून सिगरेट सोडायची आहे.' सिगरेट सोडण्यासाठी इच्छाशक्ती सगळ्यांत आवश्यक आहे. त्या इच्छाशक्तीच्या बळावरच तुम्ही सिगारेटच काय तर आयुष्यतील अनेक नकारात्मक गोष्टींवर मात करू शकता.