IMG-LOGO
मुंबई

म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस

Saturday, Mar 13
IMG

आतापर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख प्रा. अनिरूद्ध देशपांडे यांच्याकडे होती.

मुंबई, दि. १३ मार्च :  रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या संस्थेच्या अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. या प्रबोधिनीची सर्वसाधारण सभा आज मुंबई येथे पार पडली आणि त्यात ही निवड करण्यात आली. आतापर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख प्रा. अनिरूद्ध देशपांडे यांच्याकडे होती. त्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी फडणवीस यांची निवड करण्यात आली.

Share: