IMG-LOGO
मुंबई

शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Saturday, Aug 17
IMG

मी आत्महत्या करत नव्हते तर देवांचे फोटो समुद्रात फेकत होते असं या संबंधित महिलेने पोलिसांना सांगितले.

मुंबई, दि. १७ : अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवरील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडिओत दावा केल्याप्रमाणे संबंधित आत्महत्या करत होती. अटल सेतूवरील हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.  परंतु, त्याचवेळी न्हावा शेवा वाहतूक शाखेचे पोलीस तिथे आले आणि त्यांनी तिचा जीव वाचवला. परंतु, मी आत्महत्या करत नव्हते तर देवांचे फोटो समुद्रात फेकत होते असं या संबंधित महिलेने पोलिसांना सांगितले असल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी ( दि. १६ ) सायंकाळी ७ च्या दरम्यान मुलुंडवरून एक महिला कॅबने अटल सेतूवर आली. तिने अटल सेतूवर कॅब थांबवायला सांगितली. कॅबमधून उतरताच ती रेलिंगच्या पलिकडे उभी राहिली. हा प्रकार कॅबचालकाने पाहिला. त्यामुळे त्याने प्रसांगवधान राखत महिलेला धरून ठेवले. याच काळात गस्तीवर असलेले पोलीस तिथे पोहोचले. या पोलिसांनी तिला बाहेर काढले. मुलुंड येथे राहणाऱ्या या ५६ वर्षीय महिलेचं नाव रीमा पटेल असं असून ती देवांचे फोटो समुद्रात विसर्जित करत होती, असं तिने पोलिसांच्या जबानीत म्हटलं आहे. 

Share: