IMG-LOGO
मुंबई

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीचे 2200 कोटी रुपये वितरित

Friday, Jan 08
IMG

जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यात येईल.

मुंबई, दि. ८ जानेवारी : जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत विविध जिल्ह्यांत झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतक-यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या दुस-या हप्त्यापोटी दोन हजार 192 कोटी 89 लाख पाच हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन, मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मदत दोन  हजार 297 कोटी सहा लाख रुपये नोव्हेंबर 2020 मध्ये वितरित करण्यात आले होते. आता दुस-या हप्त्यापोटी दोन हजार 192 कोटी 89 लाख पाच हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान 33 टक्के नुकसान झाले आहे. अशा बाधित शेतक-यांना शेतीपिकांच्या (जिरायत व आश्‍वासित सिंचनाखालील पिके) नुकसानीसाठी हेक्टरी दहा हजार रुपये व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 25 हजार प्रतिहेक्टर या दराने दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे निर्देश आहेत. या बाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

Share: