महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयाला ही आग लागली होती. ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
नाशिक, दि. २२ जानेवारी : नाशिक महापालिकेमधील शिवसेना गटनेत्याच्या कार्यालयाला आग लागली. नाशिक महापालिकेमधील विरोधी पक्षनेते आणि शिवसेना गटनेत्याच्या कार्यालयाला आग लागलेली आटोक्यात आली आहे. महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयाला ही आग लागली होती. ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांचं कार्यालय आहे. आज सकाळी कार्यालयात पेस्ट कंट्रोल आणि सॅनिटायझेशनचं काम झाल्यानंतर काही वेळातच तिथे शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आग नियंत्रणात आणली.