IMG-LOGO
नाशिक शहर

नाशिकचे चौघे तरुण झाले लष्करात अधिकारी

Tuesday, Dec 15
IMG

एकाच वेळी नाशिकचे चार तरुण लष्करात अधिकारी बनल्यामुळे नाशिकच्या इतिहासात बहुदा पहिल्यांदाच अशा प्रकारची ऐतिहासिक घटना नोंदविली गेली आहे.

नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरानाशिक, दि. १५ डिसेंबर : इंडियन मिलिटरी अकॅडमी, देहरादून येथे काल झालेल्या पासिंग आउट परेड मध्ये नाशिकचे तिघे युवक भारतीय लष्करात अधिकारी बनून लेफ्टनंट या पदावर रुजू झाले. या अधिकाऱ्यांमध्ये अनुग्रह देशमुख, उर्मिल टर्ले आणि शाहू काळे या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच गेल्या २८ तारखेला नाशिकचाच रहिवासी असलेला उत्कर्ष दिवाने नौदलात अधिकारी बनून सब लेफ्टनंट या पदावर रुजू झाला. एकाच वेळी नाशिकचे चार तरुण लष्करात अधिकारी बनल्यामुळे नाशिकच्या इतिहासात बहुदा पहिल्यांदाच अशा प्रकारची ऐतिहासिक घटना नोंदविली गेली आहे.अनुग्रह श्यामराव देशमुख हा नाशिकरोडचा रहिवासी असून केएन केला शाळेचा माजी विद्यार्थी आहे. त्याने १२ वी पर्यंतचे  शिक्षण नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातून तर अभियांत्रिकीची पदवी आरएच सपट महाविद्यालयातून प्रथम श्रेणीत पूर्ण केली होती. त्याचे वडील श्यामराव देशमुख हे नाशिकरोड येथे व्यावसायिक आहेत तर आई रेवती यांचा ब्युटीपार्लरचा व्यवसाय आहे. अनुग्रह लष्कराच्या गोरखा रेजिमेंट मध्ये दाखल होत आहे.उर्मिल दत्ता टर्ले हा नाशिकच्या गोविंद नगरचा रहिवासी असून न्यू एरा शाळेचा माजी विद्यार्थी आहे.  त्याचे १२  वी पर्यंतचे शिक्षण पंचवटी महाविद्यालयातून तर पदवी शिक्षण नॅशनल डिफेन्स अकॅडमी येथून पूर्ण झाले आहे. ऊर्मिलचे वडील दत्ता टर्ले हे व्यावसाहिक असून आई सुवर्णा टर्ले या महिंद्रा फायनान्स मध्ये एरिया मॅनेजर आहेत. उर्मिल लष्कराच्या जाट रेजिमेंट मध्ये दाखल होत आहेशाहू संजय काळे हा हिरावाडी येथील रहिवासी असुन स्वामिनारायण शाळेचा माजी विद्यार्थी आहे. त्याचे १२वी पर्यंतचे शिक्षण भोसला महाविद्यालयातून तर पदवी शिक्षण नॅशनल डिफेन्स अकॅडमी येथून पूर्ण झाले आहे.त्याचे वडील संजय काळे हे व्यावसाहिक असून आई संध्या काळे या गृहिणी आहेत. त्याचे आजोबा स्व. किसनराव काळे हे भारतीय लष्करात सेवेत होते तसेच १९६२, ६५ आणि १९७१ च्या युद्धात सहभागी झाले होते. शाहू अधिकारी बनून लष्कराच्या ग्रेनेडिअर्स रेजिमेंट मध्ये दाखल होत आहे. नौदल अधिकारी उत्कर्ष दिवाने हा नाशिकच्या सावरकर नगरचा रहिवासी असून सिम्बायोसिस शाळेचा माजी विध्यार्थी आहे. त्याचे १२ वीपर्यंतचे शिक्षण आरवायके महाविद्यालयातून तर पदवी शिक्षण नॅशनल डिफेन्स अकॅडमी येथून पूर्ण झाले आहे. उत्कर्षचे वडील मिलिंद दिवाने हे आर्थिक सल्लागार असून आई सुहासिनी दिवाने या प्राध्यापिका आहेत.

Share: