IMG-LOGO
मुंबई

शरद पवार-हार्दिक पटेल भेटीने तर्कविर्तक सुरू

Thursday, Mar 11
IMG

पटेल यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना तात्काळ गुजरात काँग्रेस कार्याध्यक्षपदाची जबाबदारीदेखील देण्यात आली.

मुंबई, दि. ११ मार्च : काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या कार्यपद्धतीविरोधात जाहीर नाराजी व्यक्त करणारे गुजरातमधील काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय तर्कवितर्क सुरू झाले आहेत.पटेल यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना तात्काळ गुजरात काँग्रेस कार्याध्यक्षपदाची जबाबदारीदेखील देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून पटेल काँग्रेस पक्षात नाराज आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पटेल समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व न दिल्याची किंमत काँग्रेसला मोजावी लागली. काँग्रेसचे स्थानिक नेते सहकार्य करीत नसल्याची भावना हार्दिक यांनी जाहीरपणे बोलून दाखविली. त्यानंतर त्यांनी पवार यांची भेट घेतल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विस्ताराच्या दृष्टिकोनातून गुजरातमध्ये हार्दिक पटेल चाचपणी करत आहे की काय अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. त्याच अनुषंगाने ही भेट होती, असेही म्हटले जाते आहे.सकाळी झालेल्या वीस मिनिटांच्या भेटीदरम्यान गुजरात राज्यातील राजकीय परिस्थिती तसेच जातीय आरक्षण यावरदेखील चर्चा झाल्याचे समजते. हार्दिक आणि पवार यांच्या भेटीमागे मुंबईत काही दिवसांपूर्वी मृत्यू झालेले खासदार मोहन डेलकर हादेखील चर्चेचा विषय होता असे म्हटले जात आहे.

Share: