गत वर्षी महाराष्ट्र ISC (98.69) आणि ICSE (99.83) या दोन्हींमध्ये अव्वल होता.
मुंबई, दि. ६ : केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई (दहावी) (ICSE) आणि आयएससी (बारावी) (ISC) च्या परीक्षेचा निकाल आज सकाळी 11 वाजता जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना https://cisce.org/ किंवा results.cisce.org या वेबसाइटवर जाऊन रिझल्ट चेक करता येणार आहे. रिझल्ट चेक करण्यासाठी युआयडी आणि इंडेक्स नंबरची नोंद करावी लागणार आहे. आयसीएसई किंवा आयएससी निकालांमध्ये महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांचा निकाल खूप चांगला लागला आहे. या दोन्ही राज्यात 99.71 टक्के इतका निकाल लागला आहे. ISC इयत्ता बारावीच्या निकालात पश्चिम विभाग दुसऱ्या नंबरवर आहे. 99.32 इतका निकाल लागला आहे. तर, ISC इयत्ता बारावीचा सर्वोत्तम निकाल दक्षिण विभागात लागला आहे. गत वर्षी महाराष्ट्र ISC (98.69) आणि ICSE (99.83) या दोन्हींमध्ये अव्वल होता.