IMG-LOGO
मुंबई

कर चुकवेगिरीवरून झी समूहावर छापे

Monday, Jan 04
IMG

आज सकाळी मुंबईतील ’झी’च्या कार्यालयांमध्ये प्राप्तिकर विभागाच्या पथकाने तपासणी सुरू केली. वस्तू आणि सेवा कर विभागाच्या माहितीच्या आधारे प्राप्तिकर विभागाने ही कारवाई केली आहे.

मुंबई, दि. ४ डिसेंबर  : प्रसार माध्यमातील झी समूहाच्या मुंबईतील कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने सोमवारी धाडी टाकल्या आहेत. कर चुकवेगिरीच्या संशयावरुन झी समूहाशी संबंधित जवळपास 15 ठिकाणी प्राप्तिकर विभागाकडून तपास मोहीम सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.आज सकाळी मुंबईतील ’झी’च्या कार्यालयांमध्ये प्राप्तिकर विभागाच्या पथकाने तपासणी सुरू केली. वस्तू आणि सेवा कर विभागाच्या माहितीच्या आधारे प्राप्तिकर विभागाने ही कारवाई केली आहे. झी समूहाने जीएसटी कर चुकवल्याचा संशय प्राप्तिकर विभागाने व्यक्त केला आहे. बनावट बिलांच्या आधारे जीएसटी कर बुडवल्याचा संशय प्राप्तिकर विभागाने व्यक्त केला आहे. 

Share: