IMG-LOGO
नाशिक शहर

एक देश एक विधान या विषयावर अश्विनी उपाध्याय यांचे व्याख्यान : विराज लोमटे

Friday, Aug 23
IMG

विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून विविध उत्सवांचे आयोजन करण्यात येत आहे.

नाशिक, दि. २३ : राष्ट्रीय भवसागरात संकटातून सुरक्षे कडे भवसागराला घेऊन जात सेवा, सुरक्षा, आणि संस्कार या सूत्रीवर ६० वर्षांपूर्वी स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांच्या प्रमुख नेतृत्वात हिंदू संघटन, धर्म आणि धर्माचार्य यांचे सौरक्षण करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेची स्थापना गोकुळ अष्टमीच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आली. धर्मो रक्षती रक्षिता: हा संकल्प करून अविरत पणे विश्व हिंदू परिषदेचे कार्य सुरू आहे. आज मितीला २५ पेक्षा अधिक विभाग  विश्व हिंदू परिषदेच्या अंतर्गत कार्यरत असून, विविध भागात सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून संघटन हा उदात्या हेतू घेऊन कार्य सुरू आहे.  जगभरातील प्रत्येक हिंदू व्यक्तीला आज अभिमान आहे की २२ जानेवारी २०२४ रोजी श्री क्षेत्र श्रीराम जन्मभूमी  तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा आयोध्ये मध्ये  याची देही याची डोळा अनुभवायला मिळाली. या अनुभूतीच्या मागे सुमारे ७०० वर्षांचा संघर्ष असून या आस्थेच्या संघर्षाचे नेतृत्व विश्व हिंदू परिषदेने केले आहे. श्रीराम जन्मभूमी आंदोलन श्रध्येय अशोकजी सिंघल यांच्या नेतृत्वात करण्याचा निर्णय जगभराती संत, महात्मे , मठाधिपती आणि विविध आखड्यांच्या धर्म संसदेत एक मताने घेला गेला. त्या दिवसापासून अखेरच्या क्षणा पर्यंत श्रध्येय अशोकजी सिंघल यांनी संपूर्ण आयुष्य श्रीराम चरणीं अर्पण करत अविरत संघर्ष केला.  या सर्वश्रुत आंदोलनात हिंदू संघटित झाला आणि प्रत्येक हिंदूने आपले योगदान या आंदोलनात दिले याच बरोबर कोठारी बंधून सारख्या अनेक कारसेवकांनी आपले बलिदान दिले हे या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हंटले तर वावगे ठरू नये. अखंड हिंदुस्थानचे स्वप्नवत रूप या आंदोलनात दृष्टीस पडले यात शंका नाही. या आंदोलना नंतर आज प्रभू श्रीराम लल्ला त्यांच्या गर्भगृहात अभिमानाने विराजित झाले आहे. याच दरम्यान विश्व हिंदू परिषदेच्या कार्याचा विस्तार जगभरात झाला आहे.  येत्या गोकुळ अष्टमीला  विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेला ६० वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने जगभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या  मध्ये संत संमेलन, सेवा वस्ती मध्ये सेवा कार्य, श्रीराम पूजन या सारखे धार्मिक आणि सामाजिक कार्य संघटन मजबूत करत आहेत.  या शष्टब्दी पूर्ती निमित्ताने प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पुण्य नगरीत देखील विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून विविध उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू धर्मातील सर्व ज्ञाती संस्थेच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते श्री काळाराम मंदिरात महाआरती, संत संमेलन, सेवा विभागाच्या माध्यमातून सेवा प्रकल्प प्रारंभ होणार आहे.  यातील मुख्य कार्यक्रम म्हणजे विश्व हिंदू परिषदेच्या शष्टब्दी पूर्ती निमित्य विवेक साप्ताहिक , हिंदुस्तान प्रकाशन मुंबई यांच्या माध्यमातून प्रकाशित होत असलेल्या  श्रध्येय अशोकजी सिंघल यांच्या गौरव अंकाचा मुख्य प्रकाशन समारंभ २५ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता कालिदास कला मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. या प्रकाशन सोहळ्यात विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री आणि अशोकजी सिंघल यांचे निकटवर्तीय श्री अशोकजी तिवारी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहे तर सुप्रीम कोर्टातील प्रसिध्द वकील ज्वलंत प्रश्नांचे जेष्ठ अभ्यास थोर विचारवंत ऍड आश्विनीजी उपाध्याय एक देश एक विधान या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या सर्व कार्यक्रमात जनतेचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून २५ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता कालिदास कला मंदिर येथे होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा अध्यक्ष विराज लोमटे, जिल्हा मंत्री योगेश बहाळकर, जिल्हा सेवा विभाग प्रमुख नाना गोविलकर, तसेच गौरव अंक प्रकाशन समितीचे सह संयोजक केदार शिंगंने व अविनाश शिरसट , प्रशांत बोकरे राजेंद्र कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.यावेळी विश्व हिंदू परिषदे तर्फे खालील पुरस्कार देण्यात येणार आहेत. भामाशाह  पुरस्कार१ अशोक कटारिया २ आनीता प्रभू नितांत कर्मयोगीएकनाथ राव शेटे श्री निकेतन पुरस्कार १  BAPS स्वामी नारायण संस्था २  भोईराज मित्र मंडळ  गो गोपाल पुरस्कार १  मंगलरुप गोशाला २  श्री राजलक्ष्मी गोशाला

Share: