Kormo Jobs या अॅपमध्ये स्वतःची प्रोफाईल तयार करून शिफारस केल्यास पाहिजे तिथे नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे.
नवी दिल्ली, दि. २० ऑगस्ट : तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी गुगलने भारतात नोकरीसाठी Kormo Jobs हे अॅप लाँच केलं आहे. या अॅपद्वारे लोकांना नोकरी शोधण्यासाठी मदत होणार आहे. मायक्रोसॉफ्टच्या LinkedIn तसेच भारतातील बेस्ट जॉब सर्च पोर्टल्स Naukri आणि TimesJob सोबत गुगलची स्पर्धा आहे. Kormo Jobs या अॅपमध्ये स्वतःची प्रोफाईल तयार करून शिफारस केल्यास पाहिजे तिथे नोकरीसाठी अर्ज करता येणार असल्याची माहिती आहे. यात विविध सुविधा देण्यात आल्या आहे. या प्लॅटफॉर्मवर २० लाख व्हेरीफाईड नोकऱ्या उपलब्ध असल्याचं कळतंय.एखादं नवं कौशल्य प्राप्त केल्यावर त्याची माहिती त्यात समाविष्ट करून डिजिटल CV बनवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. गुगल पेमध्ये एन्ट्री लेव्हल पोजीशनसाठी जॉब स्पॉट डिजाईन केलं आहे. बांगलादेशमध्ये २०१८ मध्ये Kormo Jobs हे लाँच केलं होतं, त्यानंतर ते २०१९ मध्ये इंडोनेशियामध्ये केलं.