IMG-LOGO
नाशिक शहर

आदियोग संस्थेतर्फे गुणगौरव, प्रमाणपत्र वितरण

Saturday, Feb 01
IMG

आदियोग संस्थेतर्फे गुणगौरव, प्रमाणपत्र वितरण नाशिक, ता. 7 डिसेंबर : महाराष्ट्रातील योग क्षेत्रात कार्यरत श्री आदियोग आंतरराष्ट्रीय शिक्षण व संशोधन , साधना पीठ यांच्या तर्फे एम ए योगशास्त्र, एम ए दर्शनशास्त्र ,बीएससी योगिक सायन्स संस्कृत प्रमाणपत्र व पदविका , पदवी प्रमाणपत्र वितरण कुसुमाग्रज स्मारकात झाले.प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजय नेरकर संचालक परीक्षा विभाग एसएनडीटी विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ शिक्षण विभागाचे संचालक डॉ. जयदीप निकम, ज्येष्ठ पत्रकार प्रा. डाॅ.विश्वास देवकर व अभय सुपेकर, केंद्रीय संस्कृत

विश्वविद्यालयाचे नाशिक परिसर संचालक डॉ. गोविंद पांडे, जिजाऊ महिला संस्थेच्या संस्थापक डॉ. अश्विनी बोरस्ते , भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी उपस्थित होते. या प्रसंगी 100 पेक्षा अधिक विद्यार्थी महाराष्ट्रातून उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय दिल्ली कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक यांनी प्रदान केलेल्या पदवी, पदवी उत्तर अभ्यासक्रमांचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. योगक्षेत्रात कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील योग गुणवंत साधकांचा व विद्यार्थ्यांचा यावेळी  सत्कार करण्यात आला. या प्रसंगी  पतंजली योग सूत्र  पठणाचे प्राण ऊर्जेवर काय परिणाम होतात , याचा प्रयोगात्मक अभ्यास साधकां द्वारे करण्यात आला. संस्थेच्या  योग प्रचार योगोपचार व संशोधन विभाग प्रमुख डॉ. मधुर गवळी यांनी  संशोधन प्रयोग संयोजन केले. संस्कृत पठणाचा योग साधकांच्या आंतरिक घटकांवर काय परिणाम होतो या दृष्टीने हा अभ्यास साधकांनी केला. संस्थेचे संचालक डाॅ.संजय गवळी यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य सुलभा गवळी यांनी आभार मानले. संस्थेच्या माध्यमातून आजवर 800 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी योग  व संस्कृत शिक्षणाचा लाभ घेतलेला आहे. कोविड कालावधीत 7000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी निशुल्क शिक्षणाचा लाभ घेतला आहे.उच्च विद्याभूषित योगशास्त्रातील 30 शिक्षकांचा संच अध्यात्मिक दृष्टिकोनातून अध्यापनाचे कार्य गेली 10 वर्षे करीत आहे.

Share: