IMG-LOGO
नाशिक शहर

'फेम' च्या राज्य अध्यक्षपदी मोतीराम पिंगळेंची फेरनिवड

Wednesday, Oct 14
IMG

वेब चर्चासत्रात कोरोनाच्या संकट काळानंतर जाहिरात व्यवसाय, वृत्तपत्रे, व्यवस्थापन, एजन्सीज्, व्यवसायातील अडचणी, भवितव्य, विविध योजना आदी विषयांवर चर्चा व मंथन करण्यात आले.

नाशिक, दि. १४ ऑक्टोबर :  महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांतील जाहिरात एजन्सीज् व ऍडव्हर्टायझिंग असोसिएशनची शिखर संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ  ऍडव्हर्टायझिंग ऍण्ड मार्केटिंग इंटरप्रूनर्स (फेम) या राज्यस्तरीय संघटनेचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेब चर्चासत्र झाले. यामध्ये पुढील एक वर्षासाठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.यात फेमच्या अध्यक्षपदी पुन्हा मोतीराम पिंगळे (पिंगळे पब्लिसिटी, नाशिक) यांची, तर सचिवपदी प्रकाश शहा (डायमंड ऍडव्हर्टायझिंग, पुणे ) यांची निवड करण्यात आली. तसेच सह सचिवपदी प्रशांत कुलकर्णी-सांगली, खजिनदार मोहन कुलकर्णी-कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष विनीत कुबेर-पुणे, विदर्भाचे विभागीय उपाध्यक्ष सुनील बुधवानी-नागपूर, दक्षिण महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष कौस्तुभ नाबर-कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष किशोर गांधी, मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष अजिंक्य उजळंबकर-औरंगाबाद, डेव्हलपमेंट कमिटी अध्यक्ष रमेश कोंदलकर-औरंगाबाद, यांची कार्यकारिणीत फेरनिवड करण्यात आली. प्रसिध्दीप्रमुख दिलीप निकम (नाशिक),  तज्ञ संचालक पदी माजी अध्यक्ष अमरदिप पाटील (कोल्हापूर), माजी सरचिटणीस संदिप झवेरी (सोलापूर), कार्यकारिणी सदस्यपदी संजीव चिपळूणकर (कोल्हापूर), श्रीकांत मांढरे (अहमदनगर), राजेश मंडोरे (जळगाव), रामदेव व्यास  (औरंगाबाद), महेश कराडकर (सांगली), विकास रायभाने (औरंगाबाद), राहुल देशपांडे (सातारा) यांचा समावेश आहे.या वेब चर्चासत्रात कोरोनाच्या संकट काळानंतर जाहिरात व्यवसाय, वृत्तपत्रे, व्यवस्थापन, एजन्सीज्, व्यवसायातील अडचणी, भवितव्य, विविध योजना आदी विषयांवर चर्चा व मंथन करण्यात आले. कोरोना संकट काळ लवकरच दूर होऊन वृत्तपत्रांवरील विश्वासाहर्ता लक्षात घेता या पुढे पुन्हा व्यवसायाची दारे खुले होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला या ऑनलाईन वेबिनार प्रसंगी राज्यभरातून सर्व जाहिरात एजन्सीजचे मालक सहभागी झाले होते. फेरनिवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे राज्यभरातून स्वागत केले गेले.

Share: