IMG-LOGO
नाशिक शहर

Nashik- Dindori Loksabha : शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा नरेंद्र मोदी यांचा निशाणा

Wednesday, May 15
IMG

एक शेतकरी कांद्यावर बोला अशा घोषणा देऊ लागला. त्यानंतर त्या शेतकऱ्याला बाहेर काढण्यात आलं.

नाशिक, दि. १५ : महाराष्ट्रात निवडणुकीचा पाचवा टप्पा उरला आहे. तर देशात एकूण तीन टप्पे बाकी आहेत. मात्र प्रचासभांचा धडाका सुरु आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकमध्ये सभा घेतली. या सभेत नरेंद्र मोदी यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. काँग्रेसची अवस्था अशी आहे की त्यांना विरोधी पक्षातही बसता येणार नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातले एक नेते आहेत, त्यांनी असा दावा केला आहे की निवडणूक संपल्यावर काँग्रेस पक्षात लहान पक्ष विलीन होतील. तसा सल्लाच या बड्या नेत्याने दिला आहे. कारण त्यांना वाटतं की सगळी दुकानं सुरु आहेत ती एकत्र आली तर काँग्रेस विरोधी पक्षात बसू शकतो. ही यांची अवस्था आहे.” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंची नकली शिवसेना आणि शरद पवारांची नकली राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार हे नक्की आहे. नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होईल तेव्हा मला सर्वात जास्त आठवण येईल ती बाळासाहेब ठाकरेंची. असेही त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्ष दिवसरात्र फक्त वीर सावरकरांची निंदा करतो आहे, महाराष्ट्राची स्वाभिमानी आणि राष्ट्रभक्त जनता हे पाहते तेव्हा लोकांच्या मनातला राग खूप वाढतो. नकली शिवसेनेत अहंकार आला आहे. मात्र महाराष्ट्राला काय वाटतं आहे याचं काही देणंघेणं त्यांना नाही. नकली शिवसेनेने काँग्रेसपुढे गुडघे टेकले आहेत. शेतकऱ्याला बाहेर काढले काँग्रेसची सत्ता आली तर ते अर्थसंकल्पातला १५ टक्के भाग अल्पसंख्यांकासाठी राखून ठेवतील असं वक्तव्य नरेंद्र मोदींनी केलं. तेवढ्यात एक शेतकरी कांद्यावर बोला अशा घोषणा देऊ लागला. त्यानंतर त्या शेतकऱ्याला बाहेर काढण्यात आलं. या शेतकऱ्याने दोन ते तीन वेळा घोषणा दिल्या. त्यानंतर मोदी एक क्षण थांबले, समोरुन मोदी-मोदी अशा घोषणा येऊ लागल्या. त्यानंतर मोदींनी जय श्रीराम च्या घोषणा दिल्या. भारतमाता की जय या घोषणाही दिल्या. तसंच पुढे त्यांनी आपला मुद्दा पूर्ण केला.

Share: