नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी 21 एप्रिल 2021 हा सून्न करणारा दिवस ठरला.
महापालिकेला 'क्लीन चिट’; राज्य सरकारला अहवाल सादरनाशिक, दि. ६ मे : नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक झाल्याची दुर्घटना 21 एप्रिल रोजी घडली होती. तब्बल 24 रुग्णांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या या प्रकरणाचा अहवाल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सादर केला आहे. राज्य सरकारला सादर करण्यात आलेल्या या अहवालात महापालिकेला ’क्लीन चीट’ देण्यात आली असून दुर्घटनेचा ठपका ठेकेदारावर ठेवण्यात आला आहे. नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी 21 एप्रिल 2021 हा सून्न करणारा दिवस ठरला. त्या दिवशी महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक झाल्याची घटना घडली. त्यानंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तासाठी खंडीत झाला. 20 किलोलीटर क्षमतेची ऑक्सिजन टाकी लीक झाल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. हा प्रकार घडला, त्या वेळी रुग्णालयात 150 रुग्ण होते. त्यापैकी 23 जण रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. या दुर्घटनेत 24 जणांचा मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल विभागीय आयुक्तांनी सादर केला आहे. विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालात महापालिकेला क्लीन चीट देण्यात आली असून ठेकेदारावर ठपका ठेवण्यात आल्याची माहिती आहे. महापालिका आणि ठेकेदारांमधील करारनाम्यात कोणतीही तांत्रिक दुरुस्ती 24 तासांमध्ये करण्याची शिफारस आहे; मात्र या या कामासाठी 72 तास लागले. टँक आणि पुरवठा या दोन्ही गोष्टींना ठेकेदार जबाबदार असून आवश्यक यंत्रणा बसवण्याची जबाबदारीदेखील त्याचीच असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर पाईपलाईनची गुणवत्ता योग्य असल्याचा निष्कर्षदेखील या अहवालात काढण्यात आला आहे.विभागीय आयुक्तांच्या चौकशी अहवालानंतर काही गंभीर उपस्थित झाले आहेत. 24 तासात तक्रार सोडवा ही बेजबाबदार अट करारनाम्यात कोणी टाकली? यासाठी पालिका प्रशासन दोषी नाही का? पाईपलाईन योग्य असेल तर लिकेज कसे झाले? ठेकेदार कराराचे उल्लंघन करत असेल तर त्याला पालिका अधिकारी जबाबदार का नाहीत? हे जबाबदार अधिकारी निर्दोष कसे? सदोष मनुष्यवधाला जबाबदार कोण? या चौकशी समितीमध्ये महापालिका अधिकार्यांना घेण्याचे कारण काय?असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.