जिल्हा प्रशासनसाने १२ मे ते २२ मे या कालावधीत कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे.
लग्न समारंभ करावयाचा असल्यास नोंदणी पद्धतीनेनाशिक, ता. १० मे : राज्यात कोरोना रुग्णवाढीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिक मध्येही दैनंदिन ३ हजार कोरोना रुग्ण आढळत आहे. तर ४० रुग्णांचा रोज मृत्यू होत आहे. अशा परिस्थितीत नाशिक जिल्हा प्रशासनसाने १२ मे ते २२ मे या कालावधीत कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड,पालिका आयुक्त कैलास जाधव या प्रशासकीय समितीची आज सोमवारी (दि. १०) सकाळी बैठक झाली यात कडक लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. काय सुरु काय बंद 1. कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक आणि वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास संपुर्णत: बंदी राहील. 2. सर्व किराणा मालदुकाने, बेकरी, मिठाई व तत्सम दुकाने तसेच पाळीव प्राण्याच्या जीवनावश्यक बाबींची दुकाने सकाळी 07.00 ते दुपारी 12.00 याकालावधीत केवळ घरपोच सेवा देण्यासाठी सुरू राहतील. ग्राहक या आस्थापनांमध्ये येणार नसून ग्राहकांनी नोंदवलेल्या मागणीप्रमाणे दुकानदार माल घरपोच पोहोचवण्याची व्यवस्था करतील. या बाबतचे नियोजन संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था करतील. 3. दुध संकलन केंद्रे व घरपोच दुध वितरण व्यवस्था यांना संकलन व घरपोच विक्रीसाठी सकाळी 07.00 ते 12.00 वा. आणि केवळ संकलनासाठी सायंकाळी 05.00 ते 07.00 वा. परवानगी राहील. 4. हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, मद्यविक्री केंद्रे यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी 07.00 ते दुपारी 12.00 व सायंकाळी 5.00 ते 07.00 वाजेपर्यंत सुरु राहील. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास या आस्थापनांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. सदर ठिकाणी ग्राहक आढळुन आल्यास संबधीत आस्थापनेवर कायदेशिर कारवाई केली जाईल. याबाबतीतपर्यवेक्षणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था/स्थानिक पोलीस अधिकारी यांची राहील. 5. शिव भोजन थाळी केंद्र सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत सुरु राहील व तेथून केवळ पार्सलद्वारे अन्नपदार्थ वितरित होतील. तेथे बसून भोजन करणे प्रतिबंधित राहील. याबाबतीत पर्यवेक्षणाची जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांची राहील. 6.शासकीय रास्त भाव दुकाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांप्रमाणे सुरू राहतील. 7. उक्त कालावधीत जिल्हयातील सर्व कृषी उत्पनबाजार समित्या बंद राहतील. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची विक्री करण्याच्या दृष्टीने पर्यायी व्यवस्था विकेंद्रित पद्धतीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीची राहील. या बाबत समन्वयाची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांची राहील. 8. उक्त कालावधीत जिल्हयातील सर्व भाजी मार्केट आणि आठवडी बाजार बंद राहतील. भाजी मार्केट पूर्णतः बंद ठेवून रस्त्याच्या कडेला सुरक्षित अंतरावर आखणी करून देऊन सकाळी 07.00 ते 12.00 या वेळात भाजी, फळे विक्री करण्यासाठी जागा निश्चित करून देण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची राहील. फिरत्या हातगाडी वरून वरील वेळेतच भाजीपाला व फळे विक्री करणेस परवानगी राहील.9. औषध निर्मिती व ऑक्सिजन निर्मिती वगळता अन्य उद्योग केवळ इन सिट पद्धतीने सुरू राहतील. या आस्थापनाचालकांनी कमीत कमी मनुष्यबळाचा वापर करावा व या मनुष्यबळाची निवास व भोजन व्यवस्था कामाचे ठिकाणी अथवा नजीकच्या ठिकाणी करावी. या सर्व मनुष्यबळाचे दर दहा दिवसानंतर रॅपिड एंटीजन टेस्ट करणे देखिल अनिवार्य राहील. या सूचनांचे पालन करू न शकणारे उद्योग बंद राहतील. याबाबत सनियंत्रण करण्याची जबाबदारी प्रादेशिकअधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नाशिक व स्थानिक पोलीस स्टेशनची राहील. 10. औद्योगिक व इतर वस्तुंची पुरवठा साखळी अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक अशी स्थानिक, आंतर जिल्हा,आंतरराज्य वाहतुक, शासकीय नियमानुसार सुरु राहिल. कच्च्या व पक्क्या मालाची वाहतुक निरंतर करता येईल. नाशिक जिल्हयातुन इतर जिल्हयात जाणाऱ्या माल वाहतुक वाहनांना प्रवेश अनुज्ञेय राहिल, मात्र त्यांना जिल्हयात कोठेही थांबता येणार नाही. 11. सर्व प्रकारची बांधकामे केवळ इन सिट्र पद्धतीने सुरू राहतील. या आस्थापना चालकांनी कमीत कमी मनुष्यबळाचा वापर करावा व या मनुष्यबळाची निवास व भोजन व्यवस्था कामाचे ठिकाणी अथवा नजीकच्या ठिकाणी करावी. या सर्व मनुष्यबळाचे दर दहा दिवसानंतर रॅपिड एंटीजन टेस्ट करणे देखिल अनिवार्य राहील. याबाबत सनियंत्रण करण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची राहील.12. मेडीकल स्टोअर्स व दवाखाने तसेच ऑनलाईन औषध सेवा 24 तास कालावधीत सुरु राहतील. 13. लसीकरण केंद्रे कोरोना विषयक सर्व प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करून सुरू राहतील. केंद्र सुरू करताना किती नागरिकांचे लसीकरण होणार आहे ती संख्या दर्शविणारा फलक दर्शनी ठिकाणी लावावा व लसीकरण केंद्राचे प्रमुखाने अनावश्यक गर्दी हटवून वेळोवेळी तितकेच लोक लसीकरण केंद्राजवळ रांगेत राहतील याची शहानिशा करावी. यासाठी स्थानिक पोलिस स्टेशन अधिकारी यांनी केंद्र चालकांना सहकार्य करावे. 14.सर्व पेट्रोल पंपावर या आदेशान्वये नमूद करण्यात आलेल्या, परवानगी दिलेल्या बाबींकरीताच पेट्रोल वितरित करण्यात यावेत. मालवाहतूक, रुग्णवाहीका, शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, परवानगी पास असलेली वाहने यांचेकरीता पेट्रोल डिझेल याची उपलब्धता करुन देण्याबाबतची जबाबदारी कंपनीचे अधिकारी व उपप्रादेशीक परिवहन अधिकारी यांची राहील.15. सर्व प्रकारचे स्वागत समारंभ हॉल, मंगल कार्यालये, लॉन व तत्सम ठिकाणे हे पुर्णत: बंद राहतील. लग्न समारंभ करावयाचा असल्यास नोंदणी पद्धतीने विवाह नोंदणी कार्यालयात करण्यात यावा. यावेळी पाच व्यक्तींपेक्षा जास्त राहता येणार नाही. या सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी होत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी संबधीत विवाह नोंदणी कार्यालय प्रमुख यांची राहील. या निर्देशाचे उल्लंघन होवून लग्न समारंभ अन्यत्र आयोजीत झाल्यास आयोजक व उपस्थित सर्वाविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 व भारतीय दंड संहिता, 1860 नुसार कारवाई संबंधित पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी करतील.