IMG-LOGO
नाशिक शहर

सिटीलिंक वाहकांचा संप सुरूच; सर्वसामान्य नाशिककर प्रवाशांचे हाल

Tuesday, Mar 19
IMG

गेल्या तीन वर्षांपासून हे वाहक या बससेवेत आहेत. या काळात ही सेवा देत असणाऱ्या वाहकांना वेळेवर वेतन मिळत नसल्याच्या तक्रारी येत असल्याने त्यांच्याकडून हा आठवा संप पुकारण्यात आलेला आहे.

नाशिक, दि. १९ : वाहकांना मागील दोन-तीन महिन्यांचे तसेच मागील वर्षाचे थकीत वेतन देण्यात यावे, वाहकांचा तीन वर्षांच्या वेतनाचा फरक मिळाला पाहिजे, - येणारे नवीन वेतन हे वाढीव दराने मिळाले पाहिजे, वाहकांना देण्यात येणाऱ्या युनिफार्म हा कंपनीकडून मिळाला पाहिजे, वाहकांकडून पैसे घेण्यात येऊ नये. वाहकांकडून चुकीच्या प्रकारचे दंड वसूल करण्यात येऊ नये अशा विविध मागण्या करत नाशिकमधील शहरबससेवा असलेल्या सिटीलिंक वाहकांनी संप पुकारला आहे.मागील वर्षाचा थकीत बोनस, वर्क ऑफ लिव्हचे थकीत पैसे, वाहकांचा थकविम्यात आलेल्या पीएफ व इएसआय देण्यात यावा, वाहकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या आत देण्यात यावे, मागण्यांसाठी जे काही संप झाले, त्याचा कुठल्या प्रकारचा दंड लागू करण्यात येऊ नये अशाही मागण्या सिटीलिंक वाहकांकडून करण्यात आल्या आहेत. जवळपास पाच दिवसांपासून हा संप पुकारला असून यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे. तपोवनातील सिटीलिंक बसडेपोत १५० बसेस असून, त्या तीन शिफ्टमध्ये शहराच्या विविध भागात फेऱ्या मारतात. त्यासाठी सुमारे साडेपाचशे वाहक कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून हे वाहक या बससेवेत आहेत. या काळात ही सेवा देत असणाऱ्या वाहकांना वेळेवर वेतन मिळत नसल्याच्या तक्रारी येत असल्याने त्यांच्याकडून हा आठवा संप पुकारण्यात आलेला आहे.  

Share: