IMG-LOGO
नाशिक शहर

विजय करंजकरांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

Monday, May 06
IMG

ठाकरे गटाकडून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मुंबई, दि. ६ : उद्धव ठाकरे गटाचे नाशिकचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. विजय करंजकर यांना ठाकरे गटाकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचं सांगितलं जात आहे.नाशिक लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या जागेवरुन नाशिक लोकसभा संघटक विजय करंजकर आग्रही होते. मात्र ऐनवेळी ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. 

Share: