IMG-LOGO
मुंबई

रिपब्लिक टीव्हीच्या कार्यालयालमोर राष्ट्रवादीचे आंदोलन

Thursday, Jan 21
IMG

अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यासाठी आणि देशाची गोपनीय माहिती देणार्‍या व्यक्तीचे नाव जाहीर करावे, यासाठी रिपब्लिक टीव्हीच्या मुंबई येथील कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले.

मुंबई, दि. २१ जानेवारी :  रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात काँग्रेसह राष्ट्रवादी काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. ’गली गली मे शोर है, अर्णव गोस्वामी चोर है, अटक करा, अटक करा, अर्णव गोस्वामी याला अटक करा’, अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसने आज (21 जानेवारी) अर्णब गोस्वामी याच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. दरम्यान, उद्या काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यासाठी आणि देशाची गोपनीय माहिती देणार्‍या व्यक्तीचे नाव जाहीर करावे, यासाठी रिपब्लिक टीव्हीच्या मुंबई येथील कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. ’अर्णव गोस्वामी याला गोपनीय माहिती मिळाली आणि त्याने चॅनेलचा टीआरपी वाढवण्यासाठी उपयोग केला ही बाब गंभीर आहे. त्यामुळे त्याला तात्काळ अटक करावी व गृहमंत्री अमित शाह यांनी यावर खुलासा करावा’, अशी मागणी माजी आमदार विद्या चव्हाण यांनी केली. मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी ’अर्णव गोस्वामी यांना ही गोपनीय माहिती कुणी पुरवली याची माहिती उघड करावी’ अशी मागणी केली.या वेळी मुंबई विद्यार्थी अध्यक्ष अमोल मातेले यांच्यासह राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आणि युवक कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेस पक्षातर्फे उद्या (ता. 22) राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.

Share: