नक्षलीविरोधी मोहिमेवरून परतत असताना बुर्कापाल कॅम्पच्या सहा किलोमीटर आधी नक्षलवाद्यांनी भुसुरुंगाचा स्फोट घडवून आणला.
रायपूर, दि. २९ नोव्हेंबर : छत्तीसमडमधील रायपूरमध्ये झालेल्या माओवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या जवानाला वीरमरण आले आहे. नाशिक जिल्ह्यातील नितीन भालेराव माओवादी हल्ल्यात शहीद झाले आहेत. या स्फोटात एकूण 10 जवान जखमी झाले आहेत. त्यात 4 जवानांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतेय. सर्व जखमींना रात्री एअरलिफ्ट करण्यात आलं आहे. शहीद नितीन भालेराव हे नाशिकचे सुपुत्र आहेत. रविवारी (दि.२९) दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास विमानाने नाशिकच्या ओझर विमानतळावर दाखल झाले. नक्षलीविरोधी मोहिमेवरून परतत असताना बुर्कापाल कॅम्पच्या सहा किलोमीटर आधी नक्षलवाद्यांनी भुसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. यात ते गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेत त्यांना रायपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र त्यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला. भालेराव हे कोब्रा बटालयिन-२०६मध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. रात्री दहाच्या सुमारास हे सर्व जवान हे एक ऑपरेशन पूर्ण करुन परत येत असताना नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या वाहनास लक्ष्य केले. त्यावेळी नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला गेला. ज्यामध्ये अनेक जवान जखमी झाले. जखमी झालेल्या जवानांना तात्काळ हेलिकॉप्टरने रायपूर येथे आणण्यात आले आहे.