IMG-LOGO
नाशिक शहर

Nashik-Dindori Loksabha : उद्धव ठाकरेंच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचा झेंडा; फडणवीस यांचा आरोप

Wednesday, May 15
IMG

भारतातली मतं संपली आहेत पाकिस्तानातून मतं मागण्याचं काम विरोधक करत आहेत. राहुल गांधींसाठी पाकिस्तानाचे मंत्री पोस्ट करत आहेत.

नाशिक, दि. १५ : महाराष्ट्रात निवडणुकीचा पाचवा टप्पा उरला आहे. तर देशात एकूण तीन टप्पे बाकी आहेत. मात्र प्रचासभांचा धडाका सुरु आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकमध्ये सभा घेतली. या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारतातली मतं संपली आहेत पाकिस्तानातून मतं मागण्याचं काम विरोधक करत आहेत. राहुल गांधींसाठी पाकिस्तानाचे मंत्री पोस्ट करत आहेत. आम्हाला वाटलं की उद्धव ठाकरे वेगळे असतील. पण मला आश्चर्य वाटतं की परवा उद्धव ठाकरेंच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकत होता. असा आरोप त्यांनी केला असून नाशिक, नगर आणि मराठवाड्यात पश्चिमी वाहिन्यांचं पाणी आणायचं आहे त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. आपल्याला माहीत आहेच की मोदी है तो मुमकीन है. आपलं सरकार तुम्हाला ते पाणी देणारच. ” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. काय दुर्दैव आहे बघा, हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राच्या रॅलीमध्ये मतांसाठी जर पाकिस्तानचा झेंडा फडकत असेल तर या ठिकाणी देशभक्त मोदींच्या पाठीशी उभे राहतील. २० तारखेला भारतीताईंना निवडून द्या तसंच हेमंत गोडसेंना निवडून द्या. असे आवाहन त्यांनी या वेळी केले. 

Share: