डॉ. अनिल अवचट यांना संधी दिल्यास साहित्य संमेलनाचा मान उंचावेल आणि संमेलन लोकाभिमुख होईल.
नाशिक, दि. १६ जानेवारी : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांची निवड करण्यात यावी अशी मागणी झेन फाउंडेशनतर्फे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन संमेलनाचे संयोजक जयप्रकाश जातेगावकर, डॉ शंकर बोऱ्हाडे व संजय करंजकर यांच्याकडे देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे कि, डॉ. अनिल अवचट यांना संधी दिल्यास साहित्य संमेलनाचा मान उंचावेल आणि संमेलन लोकाभिमुख होईल, असे म्हटले आहे. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले – पाटील यांना लिहिलेल्या निवेदनावर सावाना वाचक परिवाराचे गिरीश उगले पाटील, चंद्रशेखर महानुभाव, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे, स्नेहल सावळे, विकास पाटील, सुमित शर्मा, एकनाथ साळवे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.प्रसंगी लोकहितवादी मंडळाचे सचिव सुभाष पाटील, संयोजन समितीचे डॉ.शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर यांच्याशी वाचकांनी या संदर्भात चर्चा करून आपले म्हणणे वरिष्ठ स्तरावर मांडायला लावले आहे. लवकरच साहित्य संमेलनाचे मध्यवर्ती कार्यालय सुरु होण्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.