शरद पवारांचं मुंबईतील निवासस्थान 'सिल्व्हर ओक'वरील एकूण सहा जणांची सर्वात आधी कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी दोघांना कोरोनाची लागण झालीये.
मुंबई, दि. १६ ऑगस्ट : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी कोरोनाने शिरकाव केला आहे. 'सिल्व्हर ओक' येथील पाच जणांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये सुरक्षारक्षक आणि महिला स्वयंपाकीचा समावेश आहे. यानंतर शरद पवार यांचीही करोना चाचणी करण्यात आली असून अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानातील कर्मचारी कोणाच्या संपर्कात आले होते हे शोधले जाईल. तसेच, सिल्वर ओक आणि इतर ठिकाणीचे कोणकोणते लोक या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आले याची माहिती घेतली जाईल. त्या सर्वांना क्वारंटाईन केले जाईल किंवा आवश्यकता भासल्यास त्यांची कोरोना व्हायरस चाचणीही केली जाईल, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.