परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे. अनेक मुले रस्त्यावर उतरली आहेत. पुण्यातील शास्त्री रस्ता विद्यार्थ्यांनी अडवला आहे.
युवक काँग्रेसचा महाआघाडीला घरचा आहेर; सत्यजीत तांबे यांची नाराजीपुणे, दि. ११ मार्च : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या महिन्यातील एमपीएससीची नियोजित पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा 14 मार्च रोजी होणार होती. ही परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसनेही सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली. परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे. अनेक मुले रस्त्यावर उतरली आहेत. पुण्यातील शास्त्री रस्ता विद्यार्थ्यांनी अडवला आहे. एमपीएससीसाठी दोन लाख 63 हजार मुले परीक्षेला बसली आहेत. 200 जागांसाठी या परीक्षा होत आहे. तीन दिवस आधी परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थी संतापले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयाचा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी निषेध केला आहे. कोरोनाचे संकट कितीही मोठे असले, तरीही अशा पद्धतीने अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे? या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहिजे, असे ट्वीट त्यांनी केले आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून परीक्षा स्थगितीच्या निर्णयाचा फेरविचार करायला सांगू, असे ते म्हणाले. एमपीएससीच्या परीक्षेचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलनाला सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी नवी पेठेतील दोन्ही रस्ते रोखून धरले होते. परीक्षेला अवघे तीन दिवस बाकी असताना अचानक परीक्षा पुढे ढकलल्यामुळे परीक्षार्थी नाराज झाले. त्यांनी रस्त्यावर ठिय्या सुरू केला. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी परीक्षार्थींची धरपकड सुरू केली.एमपीएससी समन्वय समितीतील उमेदवारांनी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णयाचा विरोध केला आहे. राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या रविवारी होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे. राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने कारण देऊन परीक्षा पुढे ढकलण्यात आली. कोरोना संसर्ग आणि टाळेबंदी मुळे एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या आहेत. याआधी एप्रिल, सप्टेंबर 2020 मध्ये होणार होती, ती पुढे लांबणीवर पडली.