IMG-LOGO
शिक्षण

१० वी, १२ वी पुरवणी परीक्षा २० नोव्हेंबरला

Wednesday, Oct 21
IMG

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत पुरवणी परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

मुंबई, दि. २१ ऑक्टोबर : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांच्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत पुरवणी परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. दहावीची लेखी परीक्षा २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधी होणार आहे. बारावीच्या सर्वसाधारण व द्विलक्षी विषयासाठी २० नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत तर व्यवसाय अभ्यासक्रमासाठी २० नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत परीक्षा होणार आहेत. दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा या १८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत होणार आहेत. तसेच बारावीसाठी या परीक्षा १८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत होणार आहेत.  गेल्या काही वर्षांपासून दहावी आणि बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना तत्काळ फेरपरीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची संधी मिळत होती. यानुसार दहावी, बारावीचा निकाल साधारणपणे मे महिन्यात जाहीर झाल्यानंतर तत्काळ जुलै-ऑगस्टमध्ये फेरपरीक्षा घेतली जात होती. जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जात नव्हते. पण यंदा परीक्षांचे निकालच मुळात जुलै महिन्यात लागल्याने या फेरपरीक्षाही झाल्या नाहीत. 

Share: