IMG-LOGO
शिक्षण

केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा लांबणीवर

Thursday, May 13
IMG

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यंदा 712 तर भारतीय वन सेवा परीक्षेमध्ये 110 जागा रिक्त आहेत.

नवी दिल्ली, दि. १३  मे :  कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाचा फटका या वर्षी होणार्‍या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेला बसला आहे. नियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा 27 जून रोजी होणार होती. ती परीक्षा आता 10 ऑक्टोबर रोजी होणार आहे.केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यंदा 712 तर भारतीय वन सेवा परीक्षेमध्ये 110 जागा रिक्त आहेत. देशातील वेगवेगळ्या केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाते. गेल्यावर्षी देखील या परीक्षेला कोरनोचा फटका बसला होता.  कोरोनाच्या धोक्यामुळे ही परीक्षा स्थगित करावी लागली होती.

Share: