IMG-LOGO
मुंबई

थोरात, पटोले यांच्या कार्यपद्धतीवर पृथ्वीराज चव्हाण नाराज

Thursday, Mar 11
IMG

महाविकास आघाडी सरकार हे केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आहे. काँग्रेसने आधीच या कायद्याला विरोध दर्शवला आहे.

मुंबई, दि. ११ मार्च :  काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या कार्यपद्धतीवर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. चव्हाण यांनी काँग्रेस विधिमंडळ गट नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नाव न घेता नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी सरकार हे केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आहे. काँग्रेसने आधीच या कायद्याला विरोध दर्शवला आहे. राज्यात कृषी कायदा विधिमंडळात मंजूर केला जाणार होता; पण या अधिवेशनामध्ये कृषी कायद्याबद्दल काहीच निर्णय झाला नाही, यावरून चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. विधानसभा अध्यक्षपद निवडणूक का झाली माहिती नाही; पण कृषी कायदा दुरूस्तीची भूमिका आमची होती; पण काहीच झाले नाही. वास्तविक याबाबत निर्णय होणे गरजेचे होते, असे ते म्हणाले.

Share: