६० वर्षाच्या पुढील ज्येष्ठ नागरिक व ४५ ते ५९ या वयोगटातील व्याधी असलेल्या नागरिकांना ही लस मोफत देण्यात येत आहे. सकाळी १० ते दुपारी २ या वेळात नागरिकांनी आधार कार्ड घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक, दि. १८ मार्च : नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून म्हसरूळ येथील छत्रपती शिवाजी विद्यालय मनपा शाळा येथे आज दिनांक १८ मार्च २०२१ पासून कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले.६० वर्षाच्या पुढील ज्येष्ठ नागरिक व ४५ ते ५९ या वयोगटातील व्याधी असलेल्या नागरिकांना ही लस मोफत देण्यात येत आहे. सकाळी १० ते दुपारी २ या वेळात नागरिकांनी आधार कार्ड घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. लसीकरण केंद्र सुरू करतेवेळी ज्येष्ठ नगरसेवक अरुण पवार स्थायी समिती सभापती गणेश गीते नगरसेविका रंजना भानसी भाजपा शहर सचिव अमित घुगे मनपाचे पंचवटी विभागीय नोडल अधिकारी डॉ.विजय देवकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. या केंद्रावर डॉ.निरंजनी पाटील इन्चार्ज सिस्टर चंद्रकला शिरसाठ, स्वाती पवार, मीनाक्षी बारे, पूजा जाधव, जयवंती चव्हाण दिपाली वाटाने, दीपक माळोदे, रुद्राक्ष अहिरे, आशा वर्कर ललिता शिरसाठ, सविता वाघेरे, रंजना कवर हे नागरिकांना लसीकरण करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.या केंद्राचा शुभारंभ प्रसंगी दिलीप राऊत, पोपट भानसी, भरत जुनागडे, डी.पी जाधव, तुषार भोसले, हेमंत आगळे, मनोज झिरवाळ, रणजीत गांगोडे, सत्यनारायण पांडे, अनिल मोरे, वसंत महाले, भावनेश राऊत, मेघा अहिरे, ई.आर सोनवणे, सुरज फड, हार्दिक निगळ, अतुल भानसी, शिवा पवार, सविता निकम, मनोज पवार आदी उपस्थित होते.